|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय सिनेसृष्टीतली वाद्ये दर्शवणाऱ्या एनएफएआयच्या कॅलेंडर 2020 चे माहिती आणि प्रसारण सचिवांच्या हस्ते प्रकाशन

भारतीय सिनेसृष्टीतली वाद्ये दर्शवणाऱ्या एनएफएआयच्या कॅलेंडर 2020 चे माहिती आणि प्रसारण सचिवांच्या हस्ते प्रकाशन 

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कॅलेंडर हे सिनेरसिकांनी संग्रही ठेवण्याजोगं असल्याचे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी म्हटले आहे. एनएफएआय कॅलेंडर 2020 चे गोव्यात प्रकाशन करताना ते आज बोलत होते. भारतीय सिनेमातल्या वाद्यांवर या कॅलेंडरमध्ये भर देण्यात आला असून संग्रहालयातल्या दुर्मिळ चित्रांचा यात समावेश आहे.
चित्रपट निर्माते सुभाष घई, राहुल रवैल, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्यासह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतातल्या विविध भाषांमधल्या चित्रपटात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांचा 24 प्रतिमांचा या कॅलेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे. 1946 च्या वाल्मिकी या चित्रपटात तंबोरा वाजविणारी राज कपूर यांची दुर्मिळ छबी, जयश्री गडकर वीणा वाजवताना (सीता मैय्या 1964), विष्णूपंत पागनीस एकतारी वाजवताना (नरसी भगत 1940), शिवाजी गणेशन नादस्वरम् (थिलान्ना मोहनांबल 1968) इत्यादींचा समावेश आहे. कॅलेंडरवरचा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित चित्रपट आणि त्या चित्रपटाची तपशीलवार माहिती मिळणार आहे.
भिंतीवर लावण्यासाठी आणि टेबलावर ठेवण्यासाठी अशा दोन स्वरुपात उपलब्ध असलेले हे कॅलेंडर www.nfai.gov.in वर ऑनलाईन बुकींगद्वारेही खरेदी करता येईल.

Related posts: