|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पंढरपूरात दगडाने ठेचून अज्ञाताचा खून

पंढरपूरात दगडाने ठेचून अज्ञाताचा खून 

पंढरपूर/वार्ताहर

पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ खादी ग्रामोद्योगच्या जागेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

खून झालेल्या व्यक्तीच्या अंगावरती वार केलेले दिसून येत आहेत. शुक्रवारी सकाळी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. खादी ग्रामोद्योगची जागा ही बऱ्याच वर्षापासून पडिक आहे. त्याठिकाणी रात्री तळीराम व इतर काळे धंदे चालू असतात. त्यामुळे या खुनाबद्दल शहरातून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Related posts: