|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » नाशिकच्या महापौरपदी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी 79 वर्षांच्या भिकुबाई बागुल

नाशिकच्या महापौरपदी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी 79 वर्षांच्या भिकुबाई बागुल 

ऑनलाइन टीम  / नाशिक : 

नाशिक महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकासआघाडीचा नाशिक प्रयोग फसला आहे. भाजपच्या सतीश कुलकर्णींची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात शिवसेनेने आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्याचा थेट परिणाम नाशिक महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता होती. महाशिवआघाडीचा महापौर निवडून आणण्यासाठी हालचाली सुरु होती.

नाशिकच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेत रस्सीखेच होती. भाजपकडून महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदासाठी भिकुबाई बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

नाशिकच्या नवनिर्वाचित उपमहापौर भिकुबाई बागुल या 79 वर्षांच्या आहेत. भिकुबाई या भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील बागुल यांच्या मातोश्री आहेत. राज्यात भिकुबाई बागुल या सर्वाधिक वयाच्या उपमहापौर ठरल्या आहेत.

 

Related posts: