|Friday, December 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » तरुणवयात घर खरेदी करताय…

तरुणवयात घर खरेदी करताय… 

आयुष्यातील खडतर टप्पे पाहता जीवनात तिशीतच घर खरेदी करणे ही अशक्मयप्राय बाब वाटते. या काळात करियरला नुकतीच सुरवात झालेली असते. या वयात कामानिमित्त घराच्या सुविधेपासून आपण वंचित रहात असतो. उत्पन्न कमी आणि बचतही असून नसल्यासारखी असल्याने महिन्याचा खर्च ओढून काढत असतो. अशा स्थितीत घर खरेदीचा विचार मनालाही शिवत नाही. राहणीमानावर वाढणारा खर्चच तरुण वयातील घर खरेदीत मोठा अडथळा ठरत असतो. म्हणूनच उच्च राहणीमान हे भारतीय युवकांसाठी आव्हानात्मक आहे. 2019 च्या अपेक्षा निर्देशांकानुसार 22 ते 27 वयोगटातील 39 टक्के युवकांना उच्च राहणीमानामुळे त्यांच्या आशा पूर्ण करण्यास अडथळे येत असल्याचे आढळून आले आहे. अर्थात त्यांची ओळख ही स्वत:चे घर असण्यावरूनच सिद्ध होते. एकीकडे राहणीमानाचा वाढता खर्च आणि दुसरीकडे नव्या घराचे स्वप्न या दोन्हीचा ताळमेळ कसा बसवावा हा प्रश्न निर्माण होतो. मग काय वयाच्या तिशीत मोठा जॅकपॉट लागणे गरजेचे आहे काय? तर अजिबात नाही. व्यावहारिक पातळीवर विचार केल्यास हे लक्ष्य गाठण्यासारखे आहे.

आर्थिक शिस्त

आपल्या आयुष्यातील तिशीत घराचे मालक होणे ही सोपी बाब नाही. यासाठी आपल्याकडे सुरवातीपासूनच आर्थिक शिस्त असणे गरजेचे आहे. आपण आर्थिकदृष्टय़ा स्वत: सक्षम असल्याने आर्थिक गणितात 50-30-20 असे समीकरण तयार करा. याचाच अर्थ घर खरेदीसाठी वीस टक्के रक्कम बाजूला काढून ठेवणे, किराणा सामान आणि अन्य दैनंदिन गरजा भागवण्यासाठी 50 टक्के आणि मनोरंजनासाठी 30 टक्के खर्च या रितीने आपल्या उत्पन्नाची विभागणी करावी. जर आपले उत्पन्न कमी असेल तर हे समीकरण कालांतराने आदर्श ठरू शकते. जसजसे आपले उत्पन्न वाढेल तसतसे आपल्या बचतीचे प्रमाण 20 टक्क्मयांवरून 30 वर न्यावे. प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला 20 टक्के रक्कम बचत करण्यासाठी आवर्ती जमा (रिकरिंग डिपॉझिट)चा वापर करणे फायद्याचे ठरेल. यात आपल्याकडून होणाऱया बचतीत सात टक्के व्याजाची रक्कम जोडली जाईल. ही रक्कम वेतन खात्यावर असलेल्या व्याजदराच्या 4 टक्क्मयांपेक्षा अधिक असेल. त्याचबरोबर एखादे अतिरिक्त उत्पन्न असेल तर ते देखील बँकेत जमा करावे. मग बोनस असो, भेट असो किंवा पार्टटाइम जॉबमधून मिळणारे उत्पन्न असो, वाचवलेला प्रत्येक रुपया हा घराचे मालक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करु शकतो.

मालमत्तेचा खर्च

घराचे मालक होताना अनेक लहान सहान खर्चाचा उल्लेख करावा लागतो. मुद्रांक शुल्क आणि रजिस्ट्रीचा खर्चही पाहावा लागेल. याशिवाय आपल्याला आर्थिक, कागदोपत्री कार्यवाही, फर्निचरची अदलाबदल, एजंटचे शुल्क आदीसाठी देखील खर्चासाठी रक्कम लागत असते. जर आपली मालमत्ता बांधकामस्थितीतील असेल तर परवडणाऱया घरकुल योजनेसाठी जीएसटी एक टक्का आकारला जाईल. अन्यथा हा दर पाच टक्के असेल. गृहकर्जाच्या रक्कमेसाठी अर्ज करायचा झाल्यास बँकेच्या निकषानुसार आपल्याला 80 टक्के कर्ज मिळेल. काहीवेळा ही रक्कम अधिक देखील मिळू शकते.

तिशीत घर घेताना आपले नियोजीत उद्दिष्ट ठरलेले असावे. त्याप्रमाणे बचतीचे नियोजन केले पाहिजे. आपल्या नोकरीतील वा व्यवसायातील उत्पन्नानुसार अंदाज बांधून घर घेण्याचे निश्चित केले पाहिजे. गृहप्रकल्पात घर घेताना घराची किंमत पाहून त्याप्रमाणे 15 ते 20 वर्षात कर्ज फेडता येईल याचे गणितही बांधले पाहिजे. घर घेताना विविध प्रकल्पांतील आकर्षक ऑफरवर नजर ठेवणे आवश्यक असते. पंतप्रधान आवास  योजनेंतर्गत आपल्याला गृहकर्जावरील व्याजावर अनुदानदेखील मिळू शकते. जसजसे आपले उत्पन्न वाढेल, तसतसे आपण सध्याचे घर विकून मोठे घर खरेदी करु शकता. हे घर आपल्या उत्पन्नाला साजेसे असेल.

कर्जाचा इतिहास

घर खरेदी करण्यासाठी कदाचित आपल्याला कर्जाची गरज भासू शकते. यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. आपण अलीकडे पेडिट रिपोर्टचे आकलन केले आहे काय? कारण आपल्याला कर्ज देण्यापूर्वी बँका या अहवालाचे अवलोकन करतील. चांगल्या पेडिट स्कोरसाठी आपण पेडिट कार्ड आणि हप्ता भरण्यावरुन नियमित असणे गरजेचे आहे. जर आपण बिल भरण्याबाबत चालढकल करत असाल तर पेडिट स्कोर चांगला राहणार नाही. आजकाल कर्जदाता हा 750 पेक्षा अधिक पेडिट स्कोर असणाऱया व्यक्तीसच कर्ज देण्यास प्राधान्य देतो. कर्जाची फेड योग्य त्या वेळेत केल्यास आपला क्रेडिट स्कोर चांगला राहतो. गृहकर्ज हप्त्यासाठी आपल्या मासिक उत्पन्नापैकी 40 टक्के तरी बचत वापरता आली पाहिजे, असे आपले नियोजन असावे लागते. तरच आपल्याला गृहकर्जासाठी पात्र धरले जाते.

एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करा

घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जोडीदारालाही सोबत घेऊ शकता. आपण जोडीदाराचे उत्पन्नही आपल्या उत्पन्नाला जोडून चांगली पेडिट हिस्ट्री तयार करु शकता. त्यानुसार आपल्याला अधिकाधिक कर्ज मिळण्यास हातभार लागू शकतो. हे कर्ज व्यक्तीगतच्या तुलनेत अधिक रक्कम मिळण्यास मदत करु शकते. संयुक्त गृहकर्जावर दोघांनाही 80 सी च्या कलम 24 बी अंतर्गत आकर्षक करसवलतीचा लाभ पदरात पाडून घेता येतो. आयुष्याच्या सुरवातीला घराचे मालक होणे आव्हानात्मक आहे. मात्र ते तितकेच उत्साहवर्धक देखील आहे. बचत, गुंतवणुकीच्या माध्यमातून घरासाठी प्रयत्न करता येतो. शिस्त आणि दूरदृष्टीच्या बळावर आपण घराचे लक्ष्य आपल्या जीवनात तिशीतदेखील प्राप्त करु शकता.

Related posts: