|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली अजित पवार यांची भेट

आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली अजित पवार यांची भेट 

इचलकरंजी / प्रतिनिधी

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच स्थिर सरकार देऊ शकतात असे आवाडे यांनी सांगितले.

आवाडे हे काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा व राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा देत, इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले. राज्यातील जनतेने युतीला सत्तास्थापणेचा कौल दिला असताना, रंगलेले सत्तानाट्य राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत राजकीय भूकंप घडविला. या सर्व राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर  माजी वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. एकेकाळी काँग्रेसचे एकनिष्ठ असणाऱ्या प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related posts: