|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » दुधावर प्रक्रिया करण्याची गरज

दुधावर प्रक्रिया करण्याची गरज 

शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी पशुपालनाला महत्त्व देत आहे. त्यामुळे शेतकऱयांचा आर्थिक व्यवसाय चालतो. शेतकऱयांकडे जनावरांसाठी पुरेसा चारा असल्याने पशुपालन करणे गरजेचे ठरले आहे. दुधाचा वापर मानवाच्या आहारामध्ये सर्रास केला जातो. एखाद्यावेळी जेवण नसले तरी चालेल पण सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो आणि त्या चहासाठी दूध लागते. प्रत्येकाच्या घरोघरी दुधाचा वापर केला जातो. पूर्वी आणि आताच्या दूध देणाऱया जनावरांमध्ये तसेच त्यांच्यापासून मिळणाऱया दुधाच्या प्रतिमध्ये बरीच मोठी गुणवत्ता वाढविण्यात
शास्त्रज्ञांना यश आले आहे. विविध तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे दुधाचे प्रमाणसुध्दा वाढण्यास मदत झाली आहे. यामुळेच पशुपालनांकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे.

सध्या दूध उत्पादनात भारताच पहिला क्रमांक लागतो. उत्पादीत दुधांपैकी सर्वसाधारण 46 टक्के दूध द्रवस्वरुपात आहारात वापरले जाते. आणि उर्वरित 54 टक्के दुधाचा वापर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. दूध जास्त काळ टिकविण्यासाठी व त्याची गुणवत्ता राखण्यासाठी त्यावर विविध प्रकिया करण्याची आवश्यकता भासत आहे. कारण उत्पादीत सर्व दुधाचा वापर आपण लगेच करू शकत नाही तर त्यावर प्रक्रिया करुन मानवी आहारासाठी उपयुक्त अशा विविध पदर्थांची निर्मिती करण्यासाठी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तयार केलेले विविध पदार्थ आपण निर्यात करुन त्यातून मिळणाऱया चलनातून आपली अर्थिक परिस्थिती मजबूत करू शकतो. त्यामुळे दुधावर तांत्रिक पध्दतीने विविध प्रक्रिया करुन आपले पदार्थ जागतिक बाजारपेठेत समाविष्ट करू शकतो.

मानवी आहारातील महत्त्व

लहान बालकांपासून ते वयोवृध्दापर्यंतच्या प्रत्येकाला दुधाची गरज आहे. कारण दूध पचनाला हलके असते. त्यापासून शरिराला मिळणारे अन्नघटक त्वरित मानवाला मिळतात. बारा महिने दुधाची निर्मिती होत असल्याने त्यातील आवश्यक अन्नघटक सहजासहजी मिळू शकतो.

दुधाचा वापर केवळ आहारापुरताच मर्यादित नाही. त्याचा वापर देवपूजेसाठीसुद्धा केला जातो. पिंडीला अभिषेक घालण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. पंचामृत, दही, तूप आणि इतर पदार्थ तयार करण्यासाठीसुद्धा त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.

जादा दूध देणारी गाय कोणत्या जातीची खरेदी करावी, दहय़ासाठी कोणती गाय उपयोगी ठरेल, तुपासाठी कोणत्या जातीची म्हैस किवा गाय बाळगावी याची पारख करूनच पशुपालन केल्यास शेतकऱयांची आर्थिक बाजू मजबूत ठरेल.

 दुधाचा वापर विविध औषधे तयार करण्यासाठी तसेच मानवाच्या पचनक्रियेनुसार विविध पदार्थांमार्फंत अन्नघटक म्हणून केला जातो. पूर्ण दूध, मलईविरहित दूध, ताक, लोणी, तूप यांचा उपयोग औषधी व पौष्टिक आहार म्हणून करतात. उष्णता व पित्तविकार दूर होण्यासाठी त्याचा वापर घेतल्यास विकार दूर होऊ शकतात. विशेषता लहान मुलांच्या वाढीसाठी आणि वृद्ध माणसांचा अशक्तपणा घालविण्यासाठीही दुधाचा वापर केला जातो. कारण अशक्तपणा भरून काढण्यासाठी ज्या अमिनो आम्लाची गरज असते ती आम्ले दुधामध्ये असतात. त्यासाठीच शरीरासाठी मोठय़ा प्रमाणात दुधाचा उपयोग करतात.

Related posts: