|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » कमाई कुक्कुटपालनातून

कमाई कुक्कुटपालनातून 

शेतकरी म्हटला की, काही गोष्टी आपसूक आपल्या डोळय़ासमोर उभ्या राहतात. उदा. बैलाची जोडी, गायी, एखादा कुत्रा, कोंबडय़ाचे खुराडे. याचाच अर्थ कोंबडय़ा या शेतीच्या नैसर्गिक वातावरणात वाढणाऱया आहेत आणि पिढय़ानपिढय़ा शेतकरी कुटुंबात कोंबडीपालन, अंडी उत्पादन या गोष्टी लिलया पार पाडल्या जातात. या व्यवसायाला थोडीशी शास्त्राsक्त ज्ञान आणि प्रशिक्षणाची साथ मिळाली तर ‘व्यावसायिक कोंबडीपालन’ हा शेतीसोबत एक उत्तम जोडधंदा एवढेच काय, मुख्य व्यवसायसुद्धा होऊ शकतो.

कुक्कूटपालनाची व्याप्ती खूप मोठी आहे. अगदी परसबागेतील एक-दोन कोंबडय़ापासून ते करोडो रुपयांचे आर्थिक साम्राज्य असलेल्या बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांपर्यंत अनेकजण या उद्योगात आहेत. शास्त्रशुद्ध माहिती आणि कौशल्य असेल तर कोंबडीपालना इतका चांगला स्वयंरोजगार नाही.

कुक्कुटपालन हा तसा अतिशय सोपा, कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय. या व्यवसायाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत- 1) देशी कोंबडीपालन, 2) मांसल कोंबडीपालन (ब्रायलर), 3) अंडी उत्पादनासाठी कोंबडीपालन (लेअर).

अलीकडे ब्रायलर किंवा लेअरपेक्षा गावरान किंवा देशी कुक्कुटपालनातसुद्धा अनेक सुशिक्षित युवक आणि पशुपालकांनी स्वारस्य दाखविले आहे. अनेक शेतकरी याविषयी माहिती विचारत आहेत. त्यामुळे आज आपण गावरान कुक्कुटपालन याविषयी जाणून घेऊ.

व्यवसाय कसा कराल?

मुळात हा व्यवसाय खूप कमी भांडवलात मुक्त संचार पद्धतीने (पारंपरिक पद्धतीने) सुरू करता येऊ शकतो. त्यासाठी वेगळे असे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस या जाती अतिशय काटक आणि उत्तम रोगप्रतिकारक्षम असतात.

आपण आपल्या जवळील मार्केटचा अभ्यास करून योग्य जातीची निवड करायला हवी. काही जाती या अंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध असतात तर काही जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध असतात.

1) आर. आय. आर.- ही उत्कृष्ट अंडी उत्पादक जात आहे. तांबूस काळे किंवा तपकिरी भुऱया रंगाचे पक्षी. 220 ते 240 अंडी देते. आठवडय़ाला 4 ते 6 अंडी.

2) ब्लॅक ऍस्ट्रॉलॉर्प- ही तशी दुहेरी उद्देशाने पाळण्यासारखी जात आहे. वजनानेही चांगली वाढते. तसेच योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादनसुद्धा देते.

3) गिरीराज- कर्नाटक पशुविज्ञान विद्यापीठ बेंगळूरकडून विकसित करण्यात आलेली जात. अंडी उत्पादन 130 ते 150 प्रतिवर्ष. मुक्त संचार पद्धतीने पाळण्यासाठी उत्तम जात.

4) स्वर्णधारा- अंडी आणि मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध जात. ही सुद्धा कर्नाटक विश्व विद्यालयाकडून विकसित केलेली जात.

गावरान कुक्कुटपालन आपण तीन वेगवेगळय़ा पद्धतीने करू शकतो.

1) मुक्त संचार पद्धत- मुक्त संचार पद्धतीने आपण 100 पक्षी अगदी कमी वेळ आणि कमी भांडवलात सहजपणे पाळू शकतो. एक दिवसाची पिले घेऊन त्यांना 14 ते 21 दिवसपर्यंत (अंगावर पंख येईपर्यंत) ऊब देऊन नंतर परसामध्ये मुक्त फिरण्यासाठी सोडली जातात. 1) प्रतिअंडे आणि प्रतिपिलू खर्च कमी, 2) मजुरीवरील व खाद्यावरील खर्च कमी होतो, 3) स्वच्छता करणे अत्यंत सोपे.

या पद्धतीमध्ये शिकारी प्राणी, कुत्रे यांच्यापासून स्वरक्षणासाठी जाळीचा वापर करावा.

2) डीप लिटर पद्धत- या पद्धतीमध्ये पक्षीघर (शेड) ची उभारणी केली जाते. पूर्व-पश्चिम दिशेने 25 ते 30 फूट रुंदी व आपल्याला हवी तेवढी लांबी ठेवून हवेशीर शेड उभारणी करता येते. प्रतिपक्षी 1 ते दीड स्क्वेअरफूट प्रतिपक्षी या हिशेबाने आपल्या गरजेनुसार पक्क्मया शेडची उभारणी करावी. चिकन मेशच्या जाळीच्या साहाय्याने शेड बंदिस्त करावे.

@जमिनीवर फरशी किंवा कोबा करावा.

@कोंबडय़ांना मुक्त संचारासाठी शेडला लागून मोकळी कंपाऊंड जाळी मारलेली जागा असावी.

कोंबडय़ांसाठी पिंजरा पद्धत

@या पद्धतीत स्वतंत्र असा तीन मजली पिंजरा बनविलेला असतो.

@व्यावसायिक पद्धतीने अंडी उत्पादनासाठी या पद्धतीचा वापर करतात.

@बीव्ही 380, बीव्ही 320 सारख्या जास्त अंडी देणाऱया कोंबडय़ा वापरून कमी जागेत कमी कष्टात जास्त उत्पादन घेता येते.

@अंडी स्वच्छ आणि ताजी म्हणून मार्केटमध्ये थोडा जास्त दर मिळवू शकतो.

@फिडर व निपलने पाणीपुरवठा असल्यामुळे काम खूप कमी.

नियोजन आणि काळजी

@कुक्कुटपालन सुरू करताना व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत गरजेचे.

@पिले खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी एजंटकडे न जाता विश्वास संपादन केलेल्या जबाबदार पशुपक्षी सेवा केंद्रातून किंवा शासकीय अंडी ऊबवणी केंद्रातून पिलांची खरेदी करावी.

@रोगप्रतिबंधक लसीकरण न चुकता करावे.

@पक्षी आणि अंडी जास्तीत जास्त स्वतः नजीकच्या बाजारात किंवा फार्मवर विकण्याचा प्रयत्न करावा.

– डॉ. प्रताप हन्नूरकर,

पशुवैद्यकीय अधिकारी, आंबेवाडी

Related posts: