|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची सल्लागार समितीवरून हकालपट्टी

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची सल्लागार समितीवरून हकालपट्टी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत नथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हटले आणि त्यानंतर एकच गदारोळ माजला. या पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञा यांच्यावर भाजपने कठोर कारवाई करत त्यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवरून हकालपट्टी केली आहे. पक्ष त्यांच्यावर इतका नाराज आहे की त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला चक्क लोकसभेतच देशभक्त म्हणणे भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोवले आहे. आधी विरोधी पक्षांनी या मुद्यावरून तीव्र निषेध केला. यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरुद्ध कठोर कारवाई करत असल्याचे जाहीर केले.

नड्डा म्हणाले, भाजप कधीच अशा स्वरुपाच्या वक्तव्यांचे समर्थन करत नाही. साध्वी प्रज्ञा यांना संसदेच्या संरक्षण समितीवरून हटवले जात आहे. या हिवाळी अधिवेशनात होणाऱया संसदीय गटाच्या बैठकीत त्यांना सहभागी केले जाणार नाही.

 

Related posts: