|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » ‘मी रंगा-बिल्ला सारखा गुन्हेगार आहे का?’ : पी. चिदंबरम

‘मी रंगा-बिल्ला सारखा गुन्हेगार आहे का?’ : पी. चिदंबरम 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला होता. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखुन ठेवला आहे. 

आयएनएक्स मीडिया घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगात असणारे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला विचारले, ‘मी रंगा-बिल्ला सारखा गुन्हेगार आहे का?’ त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी उद्विग्नतेने हा प्रश्न विचारला. दरम्यान त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी दोन आठवडय़ांसाठी वाढवण्यात आली आहे. रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांना 1978 साली दिल्लीत दोघा भावंडांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या दोघांनाही 1982 मध्ये फाशी देण्यात आली.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सीलबंद पाकीटाचे तीन संच स्वीकारण्याचे निर्देश रजिस्ट्रीला  दिले आहे आणि त्यांना न्यायालयाच्या निरीक्षणासाठी सुरक्षित ठेवाण्याचे आदेश दिले आहे.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान ईडीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की पी चिदंबरम हा तुरुंगवास भोगलेला निष्पाप व्यक्ती आहे असे नाही. हा विषय फक्त आयएनएक्स मीडियापुरता मर्यादित नाही तर अशा इतर कंपन्या आहेत ज्यांनी एफआयपीबी च्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे.

Related posts: