|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही

सरकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही 

मोरजी/ प्रतिनिधी :

आम्ही सरकारात असल्याने आणि लोकशाहीचे तत्वे मानत असल्यामुळे जो काही आवाज उठवायचा तो आम्ही रस्त्यावर उतरून उठवणार नाही तर आवाज करण्यासाठी विधानसभा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लोकशाहीतील आमदार मंत्री आवाज उठवत असतो ,सुशिक्षीत असलेल्या आंदोलकानी खालच्या पातळीवर जावून सरकारवर आरोप आणि टीका करू नये , आंदोलनकर्त्यांनी सरकारला मदत करावी, सूचना कराव्यात असा सल्ला मांदेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमेन दयानंद सोपटे यांनी मांदे येथे आपल्या कार्यालयात 28 रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देताना म्हादई विषयी सरकार गोमंताकीयाना न्याय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला .

श्री. सोपटे यांनी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मांदेचे माजी सरपंच तथा पंच प्रदीप हडफडकर , भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब व सरचिटणीस नरेश नाईक आदी उपस्थित होते .

म्हादई प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर जादा भास्य्य करणे योग्य नसले तरीही म्हादई विषयी सरकार न्याय देयेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .सोपटे पुढे बोलताना सांगितले कि सध्या म्हादई विषयी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू आहे , आमचा आंदोलनाला विरोध नाही मात्र वैयक्तिक पातळीवर जावून जे सरकारवर टीका करतात त्यांनी ज्ञानी असून अज्ञानी बनू नये ते उच्च शिक्षित आहेत त्याच्याविषयी आजही उद्याही आदर आहे . मात्र त्या लोकांनी टीका करताना लोकशाहीचे तत्वे आमदाराना माहित नसल्याचा जो आरोप केला त्याचे आमदार सोपटे यांनी खंडन करून ,आम्ही 32 हजार मतदारांचे लोकप्रतिनिधी म्हणून नैतृत्व करत आहोत , आमदार म्हणून लोकशाहीतून निवडून आलो , जे आमदार नाहीत त्याना लोकशाहीची तत्वे तरी माहित आहे का असा सवाल करून वैयक्तिक पातळीवर टीका बंद करण्याचे आवाहन केले .

म्हादईचा विषय हा गंभीर आहे याची आमदार आणि सरकारला जाणीव आहे , मात्र विरोधक खालच्या पातळीवर जावून जी टीका करतात त्या घटनेचा आम्ही निषेध करीत असल्याचे सांगितले . अपशब्द वापरताना भान ठेवा असे आवाहन केले . ,सरकार म्हादई विषयी न्याय मिळवून देण्याचा पुनरुच्चार सोपटे यांनी केला .

 

Related posts: