|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याशी गप्पा

‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याशी गप्पा 

पुणे / प्रतिनिधी :    

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात भारतातील सुप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

Related posts: