|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 20 हून अधिक प्रभावी हॅनीट्रपच्या जाळय़ात

20 हून अधिक प्रभावी हॅनीट्रपच्या जाळय़ात 

10 हून आमदारांची फसवणूक : सीसीबीकडून फरार आरोपींचा शोध

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकप्रतिनिधींना हनीट्रपच्या जाळय़ात अडकविणाऱया टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एकामागोमाग एक अशा धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. केवळ 6 आमदारच नव्हे तर 20 अधिक प्रभावी व्यक्ती या जाळय़ात फसल्याची माहिती बेंगळूरमधील सीसीबी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये दोन अपात्र आमदारांबरोबरच खासदार, अधिकाऱयांचाही समावेश असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी राघवेंद्र उर्फ रघू याला त्याच्या प्रेयसीसह अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी केली असता तो किंगपीन नसून त्यामागे हनीट्रपचे मोठे जाळेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2015 पासून हे जाळे सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राघवेंद्र आपल्या पेयसीच्या ओळखीवरून मालिकांमध्ये काम करणाऱया अभिनेत्रीला हाताशी धरून राजकारण्यांसह प्रभावींना हनीट्रपमध्ये अडकवत होता.  त्याची चौकशी केली असता हैदराबाद-कर्नाटक भागातील दोन आमदार, किनारपट्टी भागातील एक, चित्रदूर्गमधील एक आमदार आणि एका विधानपरिषद सदस्याला देखील या टोळीने आपल्या जाळय़ात अडकविल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीकडून पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले असले तरी त्यांच्या कॉपी मिळविण्यासाठी पोलिसांकडून शोध सुरू आहे. फरार असलेल्या आरोपींकडून व्हीडिओ व्हायरल होण्याची भीती असल्याने राजकारण्यांकडून पोलिसांवर दबाव वाढला आहे. आरोपींनी 10 हून अधिक राजकारण्यांना फसविल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बदनामीच्या शक्यतेमुळे कोणीही याविषयी तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाही.  

टोळय़ांनी काढला पळ

प्रभावींना हनीट्रपमध्ये अडकवून सहजपणे पैसे कमावणाऱयांची टोळीचा शोध सुरू झाला आहे. अटकेतील आरोपी राघवेंद्रजवळील संपर्क क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी हनीट्रपमध्ये सक्रिय असणाऱया टोळींचा शोध सुरू केल्यानंतर अनेकांनी घराला कुलूप लावून कुटुंबासह पळ काढला आहे. या टोळय़ांनी परराज्यात लपण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीसीबी पोलिसांची पथके परराज्यातही तपास करण्यासाठी रवाना झाली आहेत.

Related posts: