|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ईशान्येच्या प्रतिनिधींशी गृहमंत्र्यांची चर्चा

ईशान्येच्या प्रतिनिधींशी गृहमंत्र्यांची चर्चा 

नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाचा मुद्दा : ईशान्येतील जनतेच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयाच्या राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरी संघटनांच्या प्रतिनिधींशी प्रस्तावित नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाच्या रुपरेषेवर शनिवारी चर्चा केली आहे. या बैठकीत आसामचे मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू तसेच विविध खासदारांनी भाग घेतला आहे.

शाह यांच्यासोबतच्या चर्चेमुळे शंका दूर होण्यास मदत मिळणार आहे. ईशान्येतील सर्व घटकांशी चर्चा करण्याचा हा अत्यंत प्रामाणिक आणि लोकशाहीवादी प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी म्हटले आहे.

योग्य दिशेने वाटचाल

अंतर्गत रेषा परमिट (आयएलपी) व्यवस्थेद्वारे संरक्षित आदिवासी क्षेत्र तसेच राज्यघटनेच्या सहाव्या सूची अंतर्गत प्रशासित होणारी क्षेत्रे या विधेयकामुळे प्रभावित होणार नसल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या क्षेत्रांना प्रस्तावित विधेयकाच्या कक्षेतून सूट दिली जाऊ शकते. शाह यांनी शुक्रवारी रात्री त्रिपुरा आणि मिझोरमच्या राजकीय नेते आणि नागरी संघटनांच्या सदस्यांसोबत 4 तासांपर्यंत चर्चा केली असून योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे उद्गार आसामचे अर्थमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काढले आहेत.

नागरिकत्व विधेयक

नागरिकत्व अधिनियम 1955 मधील प्रस्तावित दुरुस्ती पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या तरतुदीशी संबंधित आहे.

Related posts: