|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तामिळनाडूमध्ये ‘एनआयए’चे छापे

तामिळनाडूमध्ये ‘एनआयए’चे छापे 

वृत्तसंस्था/ चेन्नई, नवी दिल्ली

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने शनिवारी सकाळी तामिळनाडूमधील तंजावर आणि तिरुचिरापल्ली येथे छापे टाकले. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयितावर ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोनसह अन्य साहित्य जप्त केल्याची माहिती ‘एनआयए’च्या प्रवक्त्यांनी दिली.

तंजावरमधील अल्लावुद्दीन आणि तिरुचिरापल्ली येथील एस. सफरुद्दीन या दोघा संशयित आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. जून महिन्यात कोईम्बतूरमध्ये टाकलेल्या छाप्यात मोहम्मद अझरुद्दीन ऊर्फ शेख हिदायुतल्ला याच्यासह सहा जणांना अटक केली होती. सर्वजण श्रीलंकेमध्ये ‘आयएस’साठी काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. संशयित मोहम्मदच्या संपर्कात अल्लावुद्दीन आणि सफरुद्दीन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार ‘एनआयएन’ने शनिवारी संशयितांच्या घरांवर छापे टाकले. कागदपत्रे, लॅपटॉप, सहा मोबाईल, 11 सीमकार्ड, पेन ड्राईव्ह, पाच सीडी, एक कुऱहाड आदी मुद्देमाल जप्त केला. सर्व साहित्य ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाकडे सपूर्द केले जाणार आहे. संशयितांच्या साथीदाराही बेकायदा कृत्यामध्ये सहभागी होते का, तसेच ‘आयएस’च्या थेट संपर्कात होते का, याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts: