|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्मार्टसिटी शर्यतीत ईशान्येतील राज्ये पिछाडीवर

स्मार्टसिटी शर्यतीत ईशान्येतील राज्ये पिछाडीवर 

मध्यप्रदेश सर्वात आघाडीवर : विकास प्रकल्पांचा वेग मंद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

100 शहरांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘स्मार्टसिटी’ योजनेत पश्चिम बंगाल आणि ईशान्येतील राज्ये मागे पडू लागली आहेत. मध्यप्रदेश या प्रकरणी अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत आघाडीवर आहे. शहरी विकास मंत्रालयाने जून योजनेच्या प्रगतीचा राज्यनिहाय आढावा घेतला आहे.

मागील 5 वर्षांमध्ये स्मार्ट सिटी मोहिमेच्या अंतर्गत केंद्राकडून मिळालेल्या निधीपैकी निम्मी रक्कमही अनेक राज्यांकडून खर्च झालेली नाही. सर्व राज्यांच्या 100 शहरांना स्मार्टसिटीचे स्वरुप प्रदान करण्यासाठी आतापर्यंत 18614.10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. राज्यांनी यातील 8497.09 कोटी (51 टक्के) रुपयांचाच वापर केला आहे.

उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद, मेरठ आणि रामपूर तसेच पश्चिम बंगालमधील विधाननगर, दुर्गापूर आणि हल्दिया तसेच महाराष्ट्रात नवी मुंबई आणि अमरावती अन् तामिळनाडूच्या डिंडीगुलला 5 वर्षांमध्ये केवळ 2 कोटी रुपयांचा केंद्रीय निधी मिळाला आहे. या शहरांकडून प्रस्ताव न मिळाल्याने निधीचे वाटप झाले नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

2.03 लाख कोटींचे प्रकल्प

आढावा अहवालानुसार यंदा 15 नोव्हेंबरपर्यंत 100 शहरांकडून 2.05 लाख कोटी रुपयांचे एकूण 5151 प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाले आहेत. यातील 1.49 लाख कोटी रुपयांचा खर्च येणाऱया 4178 प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 1.05 लाख कोटी रुपयांच्या 3376 प्रकल्पांचे काम सुरू आहे. तर 23170 कोटी रुपये खर्चुन 1296 प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.

अरुणाचलमधील उदासीनता

अरुणाचलच्या दोन शहरांमधील एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. आसामच्या गुवाहाटीमध्ये आतापर्यंत केवळ 5 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून यातील 2 प्रकल्पांची पूर्तता झाली आहे. मणिपूर आणि मेघालयाचे प्रगतीपुस्तक अद्याप शून्य असून सिक्कीममध्ये केवळ एका प्रकल्पाची पूर्तता झाली आहे. केवळ त्रिपुरा, नागालँड आणि मिझोरममध्ये सुमारे निम्मे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

मध्यप्रदेश, कर्नाटकची आघाडी

जम्मू-काश्मीरच्या जम्मू तसेच श्रीनगर या दोन्ही शहरांमधील 20 मान्यताप्राप्त प्रकल्पांपैकी एकही पूर्ण झालेला नाही. स्मार्टसिटीच्या शर्यतीत मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि गुजरात आघाडीवर आहेत.

Related posts: