|Friday, December 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » अमेरिकेत विमान दुर्घटना, 9 ठार

अमेरिकेत विमान दुर्घटना, 9 ठार 

दक्षिण डकोटा

 अमेरिकेत एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण डकोटामध्ये विमान दुर्घटनेमुळे 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. या विमानातून 12 जण प्रवास करत होते. दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या विमानाने चेम्बरलेन येथून उड्डाण केले होते. सर्व प्रवासी इदाहो फॉल्स येथे जात होते. विमानाच्या उड्डाणापूर्वीच चेम्बरलेन आणि सेंट्रल दक्षिण डकोटामध्ये हिमवादळाचा इशारा देण्यात आला होता अशी माहिती ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाचे अधिकारी पीटर नडसन यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत 2 मुलांनाही जीव गमवावा लागला आहे. इडाहो फॉल्स शहरासाठी विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले आहे. पिलाटस पीसी-12 हे एक इंजिन असलेले विमान विमानतळावरून उड्डाण केल्याच्या 1 मैल अंतरावर कोसळले आहे. मृतांमध्ये वैमानिकाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Related posts: