|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नोव्हेंबरमध्ये उच्चांकी जीएसटी संकलन

नोव्हेंबरमध्ये उच्चांकी जीएसटी संकलन 

1 लाख कोटींचा टप्पा पार : मागील वर्षाच्या तुलनेत 6 टक्क्यांची वाढ : केंद्राला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सरकारी तिजोरीत वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन नोव्हेंबर महिन्यात एक लाख कोटी रुपयाहून अधिक झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 03 हजार 491 कोटी रुपयाच्या घरात पोहोचले आहे. ही वाढ मागील तीन महिन्याच्या कालावधीनंतर प्रथम नेंदवली आहे. रविवारी अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी कर संकलनासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. 30 नोव्हेंबरपर्यंत 77.83 लाख जीएसटीआर-3 बी अर्ज भरण्यात आल्याची माहितीही अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2018 च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलन 6 टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी ते 97 हजार 637 कोटी रुपये इतके होते. तसेच जुलै 2019 मध्ये 1 लाख 02 हजार 083 कोटी रुपये इतके करसंकलन झाले होते. त्यानंतरच्या तीन महिन्यात हा आकडा 1 लाख कोटींचा टप्पा पार करू शकला नव्हता. आता पुन्हा नोव्हेंबरमध्ये कर संकलन 1 लाख कोटींपेक्षा अधिक झाल्याने जीडीपी घसरणीमुळे धक्का मिळालेल्या मोदी सरकारला किंचीत दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबरमधील जीएसटी संकलन

कर        संकलन (कोटी रुपये)

सीजीएसटी                     19,592

एसजीएसटी                    27,144

आयजीएसटी       49,028

अधिभार (सेस)    7,727

एकूण                 1,03,491

 

मागील पाच महिन्यातील जीएसटी संकलन (कोटी रुपये)

जुलै       1,02,083

ऑगस्ट   98,202

सप्टेंबर  91,916

ऑक्टोबर           95,380

नोव्हेंबर 1,03,492

Related posts: