|Friday, December 13, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » शेकडो भक्तांचा घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तचरणी मंत्रघोष

शेकडो भक्तांचा घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तचरणी मंत्रघोष 

पुणे / प्रतिनिधी : 

श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होत होता. 

दत्तजयंतीच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शेठ, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष होते. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२२ वे वर्ष असून दत्तजयंती उत्सव व सप्ताहाचे उद््घाटन यावेळी झाले. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 
प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, मनोजैविक व्याधींकरीता उपचार करणे, हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. दत्तात्रय ही जागृत देवता आहे. माणसाचे भावग्रहण आणि क्लेशहरण करणारी ही देवता आहे. भक्तांमध्ये दत्तमहाराजांबद्दल भाव असेल, तर दु:खहरण होईल. दत्तात्रय ही मुक्ती देणारी देवता आहे. अनेक भाविक मनोभावे या देवतेकडे प्रार्थना करतात. आज लोकांचे दु:ख, कष्ट, विवंचना दूर करणारे हे स्तोत्र म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने दत्तमहाराजांना नमन केले आहे.

Related posts: