|Friday, December 13, 2019
You are here: Home » leadingnews » अयोध्या खटला : जमियत उलेमा ए हिंदकडून फेरविचार याचिका दाखल

अयोध्या खटला : जमियत उलेमा ए हिंदकडून फेरविचार याचिका दाखल 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधत जमियत उलेमा ए हिंद या मुस्लमि संघटनेने फेरविचार याचिका दाखल केली आहे. बहुसंख्य मुस्लमि हे फेरविचार याचिका दाखल करावी या मताचे आहेत असे जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी सांगितले.

मदानी म्हणाले, न्यायालयानेच आम्हाला फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे. जमियत प्रमाणेच अखिल भारतीय मुस्लमि व्यक्तिगत कायदा मंडळही लवकरच फेरविचार याचिका दाखल करणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त रामजन्मभूमी ही प्रभू श्रीरामाची आहे, असा निकाल दिला होता. तसेच मंदिराच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट स्थापन करावी, असे आदेश दिले होते.

 

Related posts: