|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » क्रिकेटपटू मनीष पांडे अडकला लग्नाच्या बेडीत

क्रिकेटपटू मनीष पांडे अडकला लग्नाच्या बेडीत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकला. रविवारी रात्रीपर्यंत सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात खेळून संघाला विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू मनीष पांडेने आज, सोमवारी दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न केले आहे.

या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 26 वर्षांच्या अश्रिताने इंद्रजीत, ओरु कन्नयम मुनू कलावानिकलम, उदयम एनएच 4 यासारख्या मोठय़ा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 साली रिलीज झालेल्या तेलीकेडा बोली या चित्रपटातून अश्रिता शेट्टीने या क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

मनिष पांडे-अश्रिता शेट्टीआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी, टायगर पतौडी-शर्मिला टागोर या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोडय़ांनी लग्न केलं.

 

Related posts: