|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तोटय़ात

वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तोटय़ात 

मारुती सुझुकी, टाटा मोटार्ससह महिंद्रा अँड महिंद्रावर मंदीचा दबाव

वृत्तसंस्था/ मुंबई

देशाच्या वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तोटय़ात असल्याचे पाहावयास मिळत आहे. यापैकी मारुती सुझुकी, टाटा मोटार्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या उत्पादनात नोव्हेंबरमध्ये घट नोंदवण्यासह विक्रीही मंदावली आहे.

देशातील प्रमुख वाहन कंपनी मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.9 टक्के घट झाली आहे. मारुतीने नोव्हेंबरमध्ये 150630 वाहनांची विक्री केली होती. तर गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 153539 इतकी वाहने विक्री केली होती. यावर्षी स्थानिक बाजारात 139133 प्रवासी वाहनांची विक्री झाली तर गेल्या वर्षीपेक्षा यात 3.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

टाटा मोटार्सच्या स्थानिक बाजारात वाहन विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांची घसरण नोंदविली आहे. टाटा मोटार्सने मुंबई शेअर बाजारात याची माहिती सादर केली आहे. कंपनीने नोव्हेंबरमध्ये 38057 वाहनांची विक्री केली असून, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ही विक्री 50470 इतकी होती.

महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत 9 टक्क्यांची घट

महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांची घट नोंदविली आहे. वाहन विक्रीत गेल्या नोव्हेंबरमध्ये 41235 वाहनांची विक्री होती तर गेल्या वर्षी याच महिन्यात 45101 वाहनांची विक्री नोंदविल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Related posts: