|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » तामिळनाडूत पावसाचे 17 बळी

तामिळनाडूत पावसाचे 17 बळी 

वृत्तसंस्था/ कोइंबतूर

तामिळनाडूमधील कोईंबतूरनजीक नादूर गावात अतिवृष्टीमुळे सोमवारी पहाटे भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांसह 10 महिलांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने चार लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे चेन्नई, तिरूवल्लूर, कांचीपूरम येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवस तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक जिल्हय़ामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पहाटे कोईंबतूरनजीकच्या नादूर गावात पावसामुळे एका कंपाऊडची वीस फूट भिंत घरांवर कोसळली. पहाटे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य राबविले. दरम्यान, संरक्षण भिंत बेकायदा असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. याबाबत चौकशी सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related posts: