|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रवाशी महिलेचे 55 हजारांचे दागिने लंपास

प्रवाशी महिलेचे 55 हजारांचे दागिने लंपास 

प्रतिनिधी/ सातारा

उंब्रज, ता. कराड येथून साताऱयाकडे येणाऱया एका एस.टी. बसमध्ये प्रवास करणाऱया एक महिलेचे 53 हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून वंदना अशोक पोळ (वय 42, रा. एमआयडीसी एरिया वाई) यांनी ही दागिने चोरीची तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार वंदना पोळ दि. 1 रोजी सायंकाळ 5.30 च्या दरम्यान उंब्रज बसस्थानकावर साताऱयाकडे जाण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी साताऱयाकडे जाणाऱया एस.टी. बसमध्ये त्या बसल्या. वाहकाकडून तिकीटही घेतले आणि त्यांचा प्रवासही सुरु झाला. दरम्यान, एक तासाभरानंतर एस. टी. सातारा बसस्थानकात पोहोचली.

यावेळी वंदना पोळ यांच्याकडे असलेली सोन्याचे दागिने ठेवलेली डबी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपली पर्स वारंवार चेक केली. मात्र, दागिने असलेली डबी सापडली नाही. त्यांनी लगेच ही बाब वाहकाच्या कानावर घातली. या डबीत तीन तोळे वजनाचे 45 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व अर्धा तोळे वजन असलेली 10 हजार रुपयांची ठुशी असे एकूण 55 हजार रुपयांचे दागिने होते. चोरीची घटना कळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. शेवटी पोळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल केला असून या घटनेची प्रवाशी वर्गात चर्चा सुरु होती.

 

Related posts: