|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लूटमार करणारी टोळी शिरवळ पोलिसांकडून जेरबंद

लूटमार करणारी टोळी शिरवळ पोलिसांकडून जेरबंद 

प्रतिनिधी/ खंडाळा 

आशियाई महामार्गावर प्रवाशी म्हणून लूटमार करणारी आंतरराज्य टोळीला मुंबई येथे मोठय़ा शिताफीने जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये एक महिला, तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, टोळीकडून कराड, शिरवळ हद्दीतील गुह्यात चोरलेले पाच तोळे सोने, वाहनासह दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करित चार दिवसांत गुन्हा उघड करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले.

 याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 19 रोजी लूटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावर एखाद्या टोळीकडून या गुन्हय़ाचा संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने या गुह्यातील फरार आरोपीना त्वरित अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक तानाजी बरडे यांनी शिरवळ पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे व त्यांच्या पथकाला आरोपींबाबत माहिती देत सूचना करून गुह्यातील तपास यंत्रणा गतीमान केली. त्यामध्ये हवे असणारे संशयित आरोपी शादाब आलम वहाजुद्दीन अन्सारी (वय 27) रा. माहुल गाव चेंबूर नाका म्हाडा कॉलनी बिल्डींग नं. 28 प्लॅट नं. 333 चेंबूर मुंबई (मूळ रा. भगाडा, ता. नगिना जी. बीजनोर उत्तर प्रदेश), ताजुद्दीन मोहम्मद अस्लम अन्सारी (वय 27) रा. प्लॅट नं. 1205 बिल्डींग नं. 10 म्हाडा कॉलनी कोहीनूर कुर्ला मुंबई (मूळ रा. भगला ता. नगिना जि. बिजनोर उत्तर प्रदेश, मोहम्मद इम्रान रोहान अहमद अन्सारी (वय 23) रा. प्लॅट नं. 1205 बिल्डींग नं. 10 म्हाडा कॉलनी कोहीनूर कुर्ला, ( मूळ रा. अजित मिल, रखियाल मच्छी मार्केट अहमदाबाद, गुजरात), फरजाना बेगम मोहम्मद अब्दुल हुसेन (वय 40) रा. इटवारा मच्छी बाझार मारवाडी चौक लकडगंज ठाण नागपुर यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन झाले.

  या संशयीत आरोपींकडून कराड व शिरवळ पोलीस हद्दीत चोरलेले पाच तोळे सोने, वाहन असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार दिवसांत गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

 

Related posts: