|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. एक डिसेंबरपासून ही दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

नवीन गॅस सिलेंडर दरानुसार आता नवी दिल्लीत 13.5 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तिथे हा गॅस 695 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत हा गॅस 14 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. आता हा सिलेंडर 665 रुपयांना मिळणार आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये या सिलिंडरची किंमत प्रत्येकी 15 रुपयांनी वाढवण्यात आली होती. तर, नोव्हेंबरमध्ये त्यात 76 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सलग चौथ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे.

डॉलर व रुपया यातील विनिमय दराचा गॅसच्या किंमतीवर परिणाम होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनदराचा विचार करुन ही दरवाढ करण्यात आली आहे.

 

Related posts: