|Friday, December 6, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » नाट्य संगीताने सजली अभूतपूर्व स्वर दिपोत्सव मैफल

नाट्य संगीताने सजली अभूतपूर्व स्वर दिपोत्सव मैफल 

पुणे / प्रतिनिधी : 

सूर से सजी संगिनी सूरसंगिनी…रवी मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे, लावित पिसे…राधाधरमधुमिलिंद, जयजय रमारमण हरिगोविंद…बगळ््याची माळ फुले अजूनी अंबरात आणि दिल की तपीश आज है आफताब … अशा विविध गीतांनी स्वर दीपोत्सव ही मैफल वैविध्यपूर्ण ठरली. प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायकीचा आस्वाद रसिकांनी घेतला. नाटय संगीतासह नानाविध प्रकारांनी ही सजलेली अभूतपूर्व मैफल अनुभवण्यासाठी हजारो पुणेकरांनी गर्दी केली होती. 

शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट), गुजरात कॉलनी, कोथरूड तर्फे फर्माईशें प्रस्तुत स्वर दीपोत्सव या संगीत मैफलीचे आयोजन कोथरुड येथील कै.तात्यासाहेब थोरात उद्यानात करण्यात आले होते. प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी गीतांचे सादरीकरण केले. यावेळी दीपोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पीएनजी ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, संचालक वैशाली गाडगीळ, बांधकाम व्यावसायिक बढेकर ग्रुपचे संस्थापक अण्णा बढेकर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि मुख्य निमंत्रक सत्यजित धांडेकर, प्रवीण गोखले, अनिल बिडलान, धर्मराज सुतार, विनायक मारणे, संदिप अच्युत यावेळी उपस्थित होते. पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ व बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर यांनी कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले. सुधीर वरघडे, नचिकेत घुमटकर, चंद्रकांत बो-हुडे, अनिल भगत, जितेंद्र भोसले यांनी नियोजनात सहभाग घेतला. 

पृथ्वीराज सुतार म्हणाले, पुणे ही जशी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, तशी कोथरुड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. जागतिक स्तरावरील अनेक कलाकार आपली कला कोथरुडमध्ये सादर करण्यास इच्छुक असतात. त्यामुळे अशा कलाकारांना व्यासपीठ निर्माण करुन आपली संस्कृती व कला जोपासत सांस्कृतिक वारसा पुढे सुरु ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

कार्यक्रमाची सुरुवात भूप रागातील बंदिशीने झाली. त्यानंतर द्रुत रागातील बंदिश सादर झाली. शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांच्या आवाजातील गाजलेल्या सूर से सजी संगिनी या गीताला रसिकांनी टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर सादर झालेल्या संगीत मानापमान नाटकातील तिलककामोद रागातील रवी मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे, लावित पिसे या नाट्यगीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. संगीत सौभद्र नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कारांनी संगीत दिलेले यमन रागातील राधाधरमधुमिलिंद, जयजय रमारमण हरिगोविंद या नाट्यगीताने वातावरणात उत्तरोत्तर रंग भरला. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ हे नाट्यगीत दरबारी कानडा या रागात सादर झाले. राहुल देशपांडेच्या गायनाने रसिकांना अविस्मरणीय संगीतानुभूती दिली.

Related posts: