|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी तर्फे रविवारी आरोग्य मार्गदर्शन शिबिर

माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी तर्फे रविवारी आरोग्य मार्गदर्शन शिबिर 

       माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी यांनी संयुक्तपणे एका मार्गदर्शनपर आरोग्य जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी  सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत आय एम ए हॉल बेळगाव येथे माध्यमांतील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसाठी तपासणी शिबीर आणि आरोग्य मार्गदर्शन मेळावा होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या भाकितानुसार लवकरच लवकरच भारत हृदयरोगाची जागतिक राजधानी होणार आहे. मधुमेहाच्या बाबतीत आपण ही गोष्ट दुर्दैवाने आधीच खरी करून दाखवली आहे.   

       एका सुप्रसिद्ध दैनिकातील वृत्तांतानुसार भारतात सध्या दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडत आहे. खाण्यापिण्याच्या बदललेल्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव असलेला बैठा दिनक्रम, वाढलेला मानसिक तणाव आणि व्यसने या सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. केवळ हृदयरोगच नव्हे तर त्यास कारणीभूत ठरणारे मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा हे आजारही साथीच्या रोगाप्रमाणे घराघरांमध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. शस्त्रक्रिया व औषधोपचार यावर भारतीयांचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. हे सर्व टाळणे नक्की शक्य आहे हे माधवबागच्या हजारो रुग्णांनी सिद्ध करून दाखवले आहे.

       जीवनशैलीतील योग्य बदलांना आयुर्वेदिक पंचकर्म, गुणकारी औषधे, योग्य पोषणमूल्ये असलेला आहार, योग आणि व्यायाम यांची जोड दिली तर हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांना परतवता (रिव्हर्सल) येते देशभरातील सहा राज्यांमध्ये पसरलेल्या दोन हॉस्पिटल व दोनशेहून अधिक क्लिनिक्समधील रुग्णांनी हे स्वतः अनुभवले आहे. या उपचारांना संपूर्ण हृदय शुद्धिकरण असे नाव देण्यात आले आहे. कॉपीराइट प्राप्त असलेल्या या उपचारांच्या उपयोगितेवर शंभरहून अधिक अभ्यासप्रबंध देश-विदेशातील प्रतिष्ठाप्राप्त वैद्यकीय परिषदांमध्ये व प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदाचे ज्ञान आणि जीवनशैलीतील बदल यांची सांगड घालून बनवलेल्या या उपयुक्त पर्यायाची माहिती समाजातील जास्तीत जास्त लोकांना पुरवण्याची आवश्यकता आहे. याचसाठी माधवबाग विविधप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असते.

       वृत्तमाध्यमे व पत्रकार हे समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य अतिशय परिणामकारकपणे करत असतात. असे असले तरी या कामातील मानसिक तणाव, कामाच्या अनियमित वेळा, आहाराचे कुपथ्य यामुळे या माध्यमातील घटकांचे स्वतःचे आरोग्य हवे तितके ठणठणीत नसते. म्हणूनच माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी  आय एम ए हॉल बेळगाव येथे माध्यमांतील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसाठी तपासणी शिबीर आणि आरोग्य मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी उपस्थितांना माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

      जास्तीत जास्त पत्रकारांनी आणि माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित राहावे असे आवाहन माधवबाग चे डॉ. प्रसाद देशपांडे आणि पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद सु प्रभू यांनी केले आहे.
      या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कृपया 9766875555 या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related posts: