|Friday, December 13, 2019
You are here: Home » leadingnews » मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा : पंकजा मुंडे

मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा : पंकजा मुंडे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे यांनी काही दिवसापुर्वी आपल्या फेसबुक पोस्ट वरुन नाराजगी व्यक्त केली होती. मला 8-10 दिवस चितंन करायचे आहे. मी 12 डिसेंबरला आपल्या सर्वांना भेटेल. आपले नेते गोपीनाथ मुंडे जी यांचा वाढदिवस आहे तेव्हा मी पुढे काय करावे आणि कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवेल, असे पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले होते. त्यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते.

त्या म्हणाल्या, मी पक्ष सोडणार या फक्त अफवा आहेत. या अफवांमुळे मी खूप व्यथित आहे. मी भाजपा सोडणार नाही असं ही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, पंकजा मुंडे दरवषी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.

 

Related posts: