|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गेल्या 10 वर्षात रेल्वेची कमाई घटली

गेल्या 10 वर्षात रेल्वेची कमाई घटली 

रेल्वेचा 2017-18 या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशिओ 98.44 टक्क्यांवर, पॅगचा अहवाल

मुंबई / प्रतिनिधी

वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली आणि प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेली रेल्वे गेल्या काही वर्षात विविध समस्यांमधून जात आहे. अशातच महालेखा परिक्षकांच्या (पॅग) अहवालातून भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाईचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे. यामुळे रेल्वेचा 2017-18 या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशिओ 98.44 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच रेल्वे 98 रुपये 44 पैसे खर्च करीत केवळ 100 रुपयांची कमाई करीत असल्याचे पॅगच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. दरम्यान, सर्वाधिक सोईसुविधांनी समृद्ध असा प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. परंतु, प्रत्यक्षात आवश्यक सेवासुविधातूनही रेल्वेला केवळ एक रुपया 56 पैशांचा फायदा होत आहे. तसेच पॅगच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षात आयबीआर आयएफमार्फत जमा केलेल्या पैशाच्या वापर न होणे हे देखील रेल्वेसाठी घातक ठरल्याचे पॅगने आपल्या अहवालातून सांगितले आहे.

पॅगच्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेवरील गेल्या 10 वर्षातील ऑपरेटिंग खर्च

आर्थिक वर्ष       ऑपरेटिंग खर्च    

2008-09        90.48 टक्के

2009-10        95.28 टक्के

2010-11         94.59 टक्के

2011-12         94.85 टक्के

2012-13         90.19 टक्के

2013-14         93.06 टक्के

2014-15         91.25 टक्के

2015-16         90.49 टक्के

2016-17         96.05 टक्के

2017-18         98.44 टक्के

Related posts: