|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डिजिटल सह्यांचा गैरवापर सर्रास सुरुच

डिजिटल सह्यांचा गैरवापर सर्रास सुरुच 

एमसीआयचे नियम धाब्यावर, कारवाई होवूनही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट

रुग्णाचे आरोग्य अहवाल साक्षांकित करताना पॅथमध्ये सही करणारा तज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित असणे बंधनकारक असल्याचे एमसीआयचा नियम सांगतो. मात्र एका पेक्षा अधिक पॅथॉलॉजीमध्ये उपस्थित न राहता आरोग्य अहवालांवर सही करणाऱयां सह्याजीरावांवर कारवाई होत असताना आता डिजिटर सह्यांचा गैरवापर होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. हे सर्व प्रकार एमसीआयचे नियम धाब्यावर बसवून वर्षानुवर्षे केले जात आहेत. यावर नियंत्रण नसल्याचे धक्कादायरित्या समोर येत आहे.

आरोग्य अहवाल देताना लॅबमध्ये डॉक्टर उपस्थित राहतो की नाही याबाबतची नोंद कुठेही नसल्याचे अशा तक्रारींमधून स्पष्ट होत आहे. आता एका पेक्षा अनेक लॅबमध्ये उपस्थित न राहता आरोग्य अहवालांवर डिजिटल सह्या केल्या जात आहेत. हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर आहे. वेबबेस टेक्नॉलॉजीमध्ये ऑन लाईन आरोग्य अहवाल तपासले जात आहेत. असे करत असताना एका क्लिकवर त्या आरोग्य अहवालाला साक्षांकित केले जावू शकते. या सॉफ्टवेअर मध्ये तशी सुविधा देण्यात आली आहे. मात्र एमसीआयच्या नियमानुसार उपस्थित असलेल्या पॅथालॉजी लॅबमधीलच आरोग्य अहवालांवर तज्ञ सही करु शकतो. डिजिटल सह्यांने आरोग्य अहवाल साक्षांकित करण्याचे प्रकार सध्या वाढीस लागल्याचे तक्रारी मिळत आहेत. पुण्यातील रुग्णाच्या आरोग्य अहवालावर मुंबईत बसून सॉफ्टवेअर प्रणालीने डिजिटल स्वाक्षरी करु शकतो. हा आरोग्य अहवाल स्क्रीन वर तपासून एका क्लिकवर सही केली जाते. रुग्णाला मात्र डॉक्टर उपस्थित असून सही केली गेली असल्याचे भासवले जाते. 

डॉ. रोहित जैन या डॉक्टराने एमसीआय कडे डॉक्टरांच्या डिजिटल सह्यांबाबत विचारणा करुन आरोग्य अहवालावर डिजिटल सही करताना डॉक्टर त्या †िठकाणी उपस्थित नसल्यास चालेल का असा प्रश्न विचारला. यावर रुग्णाचा अहवाल ज्या पॅथॉलॉजीकडून देण्यात येतो त्या ठिकाणी सही करणारा डॉक्टर उपस्थित असावा असे एमसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया,

‘गुजरामधील एका प्रकरणा नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक तज्ञ डॉक्टराच्या उपस्थितीत व निरीक्षणाखाली आरोग्य अहवालावर सही करणे बंधनकारकच आहे. तिथे उपस्थित नसताना सही केल्यास तज्ञ डॉक्टर रुग्णाला आरोग्य अहवालाबाबत कसे बरे सांगू शकतो?’ – डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, राज्य वैद्यकीय परिषद.

Related posts: