|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय टेटे संघ मानांकनात आठवा

भारतीय टेटे संघ मानांकनात आठवा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अलीकडच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्षेत्रामध्ये भारतीय पुरूष संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे जाणवते. आयटीटीएफतर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या पुरूष सांघिक टेबल टेनिस मानांकनात भारताने पहिल्यांदाच आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.

या मानांकन यादीत गेल्या महिन्यात भारतीय पुरूष संघ नवव्या स्थानावर होता पण नुकत्याच झालेल्या विश्व चषक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या जी सत्येनची कामगिरी समाधानकारक झाल्याचे दिसून आले. तसेच भारताच्या हरमीत देसाईने आयटीटीएफची  इंडोनेशिया चॅलेंज खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारतीय टे.टे. संघातील शरथ कमल, जी. सत्येन यांनी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भरीव कामगिरी केली आहे. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत शरथ कमल आणि जी सत्येन यांनी सुवर्णपदक तर आशियाई स्पर्धेत कास्यपदक मिळविले.

Related posts: