|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हनिट्रप फसवणूक प्रकरणी 5 जणांना अटक

हनिट्रप फसवणूक प्रकरणी 5 जणांना अटक 

माळमारुती पोलिसांची कारवाई : दोन महिलांचा समावेश

बेळगाव / प्रतिनिधी

शहरात हनिट्रपद्वारे फसवणुकीचे (ब्लॅकमेल) आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. मंगळवारी माळमारुती पोलिसांनी हनीट्रपद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱया 5 जणांच्या टोळक्मयास अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सदर आरोपींनी वीरभद्रनगर येथील एम. एम. मुजावर यांच्याकडून 5 लाखाची मागणी केली होती. रक्कम न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी आलिशान शहाबुद्दीन सय्यद (रा. काकर स्ट्रीट कॅम्प), अकीब अल्लाबक्ष बेपारी (रा. मार्केट स्ट्रीट, कॅम्प), सलमान गुलाजबेग (बिफ बाजार स्ट्रीट, कॅम्प) आणि बीबी आयेशा अब्दुलसत्तार शेख (रा. महांतेशनगर) आणि हिना अकबर सवनूर (रा. रुक्मिणीनगर) यांना अटक केली आहे. एम. एम. मुजावर यांचा कापड विक्रीचा व्यवसाय असून, या व्यवहाराशी संबंधित बीबी आयेशा शेख हिने त्यांचे 6 लाख रुपये देणे होते. सोमवार दि. 2 रोजी मुजावर हे महांतेशनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून बाहेर आले असता बीबी आयेशा आणि हिना सवनूर या मुजावर यांच्या कारजवळ वाट पहात उभ्या होत्या. मुजावर आपल्या कारजवळ आल्यावर त्यांनी तुमचे आम्ही पैसे देणार  असल्याचे सांगून त्यांना आपल्या घरी नेले. या ठिकाणी आलिशान सैय्यद, अकिब बेपारी आणि सलमान बेग आधीच हजर होते. या सर्वांनी मिळून मुजावर यांना कोंडून घातले, त्यांचे कपडे उतरवून त्यांच्या जवळील 16500 रुपये आणि हातातील घडय़ाळ काढून घेतले. त्यांचा व्हिडीओ बनविला व 5 लाख रुपयांची मागणी केली.

पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून हा व्हिडीओ सोशल मीडियावर सोडण्याची धमकी दिली. यामुळे मुजावर यांनी बँकेतून अडीच लाख रुपये घेऊन येतो, असे सांगून तात्काळ माळमारुती पोलीस स्थानकात येऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाची माहिती मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांना दिली. बरमणी यांच्या नेतृत्वाखाली माळमारुतीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तलवार यांच्यासह एम. जी. कुरेर, केंपण्णा गौरानी, लतिफ मुशापुरी, व्ही. एस. दोडमणी, शिवशंकर गुडदैवगोळ, मंजुनाथ मलसर्ज आणि महिला कर्मचारी जे. के. लंडगी, एस. आय. गाळी आदींनी शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 16500 रुपये आणि मुजावर यांचे घडय़ाळ तसेच व्हिडीओसाठी वापरण्यात आलेला मोबाईल, तीन मोटारसायकली जप्त केल्या. माळमारुती पोलीस स्थानकात प्रकरणाची नोंद झाली आहे.

Related posts: