|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सेनेचा विरोध

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सेनेचा विरोध 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

एसपीजी विधेयकानंतर आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नागरिकत्व दुरुस्ती ’ विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक पुढील आठवडय़ात संसदेत सादर केले जाणार आहे. या विधेयकात शेजारी देशांमुळे
आश्रयासाठी आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ईसाई समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. हे विधेयक भारतीय राज्यघटनेच्या तत्वांच्या विरोधत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. नागरिकांमध्ये त्यांच्या श्रद्धेच्या आधरे भेद केला जाऊ शकत नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

 

Related posts: