|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » गुगलवर फोटो पाठविण्याची फेसबुकची नवी सुविधा सादर

गुगलवर फोटो पाठविण्याची फेसबुकची नवी सुविधा सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फेसबुककडून नवीन सुविधा सादर करण्यात आली आहे. यामध्ये फेसबुकवरील फोटा थेट गुगलफोटोमध्ये पाठविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ही सुविधा फक्त आर्यलँडमध्ये सादर करण्यात आली आहे. परंतु 2020 च्या सुरुवातीच्या पहिल्या सहा महिन्यात संपूर्ण जगभरात ही सेवा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

फेसबुकने म्हटले आहे. की या सुविधाचा वापर गुगल फोटोसोबत सुरु करण्यात येत आहे. परंतु यामध्ये अन्य सेवांचाही समावेश करणार आहे. सर्व डाटा ट्रान्सफर एनक्रिप्टेड असणार आहेत. आणि ट्रान्सफरची सुविधेळी ग्राहकांकडून पासवर्ड मागण्यात येणार आहे.  ही सुविधा सादर करण्याची घोषणा फेसबुककडून मागील वर्षात केली होती.

काय आहे डाटा ट्रान्सफर योजना?

फेसबुक डाटा ट्रान्सफर योजना ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरसोबत मिळून ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. डाटा पोर्टेबिलिटीला सपोर्ट करण्यासाठी आणि दहा दिशामधील नवीन सुविधा तयार असल्याची माहिती फेसबुकने सप्टेंबरमध्ये दिली होती.

Related posts: