|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महसूल निरीक्षक कार्यालयातील गैरकारभार थांबवा

महसूल निरीक्षक कार्यालयातील गैरकारभार थांबवा 

प्रतिनिधी/ बेळगाव

जुन्या तहसिलदार कार्यालयाशेजारी असलेल्या चावडीमधे चिरीमिरी घेतल्याखेरीज कामकाज होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. तरीदेखील येथील मद्यपी कामगाराच्या गैरकाराकडे तहसिलदारांनी दुर्लक्ष केले असल्याने मनमानी कारभार वाढला आहे. तसेच काळी आमराई येथील तलाठी आणि महसुल अधिकारी कार्यालयातदेखील कारभाराचा बोजवारा उडाला असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.

महसुल खाते म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, त्यामुळे या कार्यालयात काम करणाऱया कामगाराचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रत्येक कामासाठी मोठयाप्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. वारसा दाखल्यावर सही करण्यासाठी हजार ते पंधराशे रूपयाची मागणी करून वारसाची कागदपत्रे अडवून ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच चावडीमध्ये कार्यरत असलेल्या मद्यपी कामगारांची मनमानी वाढली असून तक्रार करूनही याची  साधी चौकशी तहशिलदार किंवा महसुल निरीक्षकांनी केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महसुल विभागाच्या गैरकारभारबाबत आणि भ्रष्टाचारबाबत तक्रारी होवूनही याकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी कानाडोळा केला केली असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

महसुल विभागाच्या कारभाराची चौकशी होत नसल्याने काळी आमराई येथील ग्रामीण भागातील महसुल निरीक्षक व तलाठी कार्यालयात मोठयाप्रमाणात नागरिकांची हेळसांड होत आहे. खासगी इमारतीमध्ये थाटण्यात आलेल्या कार्यालयात हंगामी तत्वावर कामगारांची नियुक्ती करण्यात आली. पण सदर कामगार नागरिकांची कामे व्यवस्थित आणि वेळेवर करीत नसल्याच्या तक्रारी मोठयाप्रमाणात होत आहेत. तसेच मोठयाप्रमाणात पैशाची मागणी केली जात नाही. पैसे न दिल्यास कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रकार वाढला आहे. याकडे महसुल निरीक्षकांनीदेखील दुर्लक्ष केले असून त्यांच्या आशिर्वादामुळे येथील कामगारांची मुजोरी वाढली असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. महसुल निरीक्षक कार्यालयातील कारभाराकडे प्रांताधिकारी आणि महसुल निरीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Related posts: