|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » गो-संशोधनासाठी पारगावच्या पूनम राऊत यांना पुरस्कार

गो-संशोधनासाठी पारगावच्या पूनम राऊत यांना पुरस्कार 

 पुणे / प्रतिनिधी : 

गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गो-संशोधनावर आधारित काम करणाऱया देश आणि राज्यातील व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कोलकाता, पश्चिम बंगाल येथील गो-सेवा परिवारामार्फत पंचगव्य आधारित ग्रामविकास साधणारे ललित अग्रवाल, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत व पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

आज (शनिवारी) शुभारंभ लॉन्स, डी. पी. रस्ता येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱया कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गोविज्ञान संशोधन संस्थेचे राजेंद्र लुंकड, रवी रबडे, अनिल व्यास यांनी ही माहिती दिली.

गो-विज्ञान केंद्राद्वारे कँन्सर, डायबेटिस यांसारख्या दुर्धर आजारावर गोमूत्राचा वापर करून औषधे तयार करण्यात आली आहेत. त्याचा राज्यभरातील अनेक रुग्णांना चांगला उपयोग होत असल्याची माहिती संस्थेचे राजेंद्र लुंकड यांनी दिली. या औषध पद्धतीची नोंदणीही करण्यात आली असून, लाखो रुपये खर्च करून दुर्धर आजाराशी लढा देणाऱया रुग्णांना अत्यंत अल्प दरात सेवा दिली जात असल्याचे लुंकड यांनी सांगितले.

Related posts: