|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लेखकांनी समाजोपयोगी लेखन करावे : अरुणा ढेरे

लेखकांनी समाजोपयोगी लेखन करावे : अरुणा ढेरे 

रत्नागिरी/प्रतिनिधी

पूर्वीच्या काळात साहित्यिकांचा शब्द ‘जबाबदारमानला जायचा. मात्र आता काही साहित्यिक आपण विक्रय वस्तू आहोत, अशा रितीने वागत आहेत. त्यांनी स्वत:ला बाजारात आणले आहे. आज सर्वांनी वाङ्मय कसे असावे याचा विचार करण्याची गरज आहे नाही तर उद्याच्या पिढ्या आपल्याला जबाबदार धरतील. लेखकांनी समाज पुढे जाईल असे लेखन केले पाहिजे असे प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, जनसेवा ग्रंथालय, शहर वाचनालय आणि स्व. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाच्या वतीने अरुणा ढेरे यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन शुक्रवारी शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात केले होते. त्या वेळी अरुणा ढेरे यांची मुलाखत विनय परांजपे आणि प्रा. जयश्री बर्वे यांनी घेतली. या वेळी प्रकाश दळवी, मुरलीधर बोरसुतकर, अध्यक्ष डॉ. सुरेश जोशी, नमिता किर, मोहिनी पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कुठे उतरला आहेसया कवितेने ढेरे यांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. अरुणाताईंनी सांगितले की, आठव्या वर्षी कविता करू लागले. वाङ्मयाच्या प्रेमात पडावे लागते. भाषा व माध्यमाच्या मोठा साहित्यिक विलक्षण लिहितोय. त्या लेखकाची खोली उंचीचे लेखन वाचतो, आपण लिहू शकता नाही, तरीही लिहितो, अवघड वाट असली तरी लिहितो, कविता ही गोष्ट साक्षात्काराची गोष्ट आहे. कॉलेज जीवनात खर्या अर्थाने लिहायला सुरवात केली.

अरुणा ढेरे म्हणाल्या की, रत्नागिरीतील 4 संस्था एकत्र येऊन माझा सत्कार केला याबद्दल खूप आनंद होत आहे. एकेकाळी आम्ही मोठे होताना साहित्य क्षेत्रात एकसंधपणा पाहायला मिळाला. आमची तरुण पिढी ज्येष्ठांचा आदर्श घेत होती. हे सौजन्यशील वातावरण झपाट्याने बदलत गेले. बदलाच्या केंद्रस्थानी साहित्यिक असावेत असे चित्र होते. संमेलनाच्या बिनविरोध अध्यक्षपदाच्या बदलत्या धोरणाला हातभार म्हणून मी हो म्हणाले. हा सन्मान म्हणून नाही तर हे पद जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे. वाचक, लोकांना जो आनंद झाला तो मलाही आहे. साहित्यिक हा सुखदुःखावर बोलत असतो. सर्जनशील पातळीवर तो लिहितो व त्याला वाचकांकडून बळ मिळाले की आनंद मिळतो. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे. माझी वाट अजून संपायची आहे. आज साहित्यिक प्रसाद मिळाला आहे.

त्या म्हणाल्या की, . चिं. तथा अण्णा ढेरे यांच्या घरात जन्म झाला. वडिलांनी ज्ञानाच्या ओढीने पुस्तक संग्रह केला. भिंती व जमिनीपासून छतापर्यंत पुस्तकांचा प्रचंड संग्रह होता. पानशेतच्या पुरात वाहून गेला, पुन्हा गोळा केले. आम्ही पुस्तकांच्या घरात राहत होतो. आम्ही फक्त देखभाल करतो, असे मी सांगायचे. या घरात विद्वान, साहित्यिक आणि लोकसंस्कृती कलाकार यायचे. मी लहानपणापासून ग्रंथ घरात वावरले, त्यामुळे मला साहित्यासाठी माती कसदार करायला उपयोग झाला. आता मला याचे महत्व कळते आहे. मौखिक परंपरा ही महत्त्वाची आहे. त्यातूनच पुढे कवितेची वाट सापडली. जुने संचित रामायणमहाभारताशी निगडित आहे. वर्तमानात काळानुसार धारणा एका बाजूला व काळाच्या पलीकडे जाणारे असते ते आपण नव्या अंगाने लिहू शकतो. रामायण हे वाल्मीकीचे पण भारतात प्रांतोप्रांती लोकरामायण आहे.

यावेळी अरुणा ढेरे यांनी डॉ. जोशी व सौ. जोशी यांचा अमृत महोत्सवानिमित्त शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाकून नमस्कार केला, हे विशेष. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश जोशी म्हणाले की, स्त्राrचा सन्मान लेखनातून करण्याचे कार्य अरुणाताईनी केले आहे. वाचकांना पुढे नेण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. भाषेत खूप गोडवा भरपूर आहे. होकारात्मक जगणे, वागणे महत्वाचे आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे.

प्रास्ताविकामध्ये नमिता कीर म्हणाल्या की, 1990 च्या संमेलनात मधुभाईंना रत्नागिरीकरांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यानंतर अनेक संमेलने झाली, पण संमेलनाध्यक्षांचा सत्कार रत्नागिरीमध्ये प्रथमच 29 वर्षांनी संमलेनाध्यक्ष ढेरे यांचा सत्कार करण्याचा योग आला. त्यांना पूर्वसुरींचा आशीर्वाद लाभला आहे. साहित्य क्षेत्रात त्या लोकप्रिय आहेत. त्यामुळे आज खूपच आनंद होत आहे.

साहित्यिकांनी प्रवाही लेखन करावे

सर्व बाजूंनी असहिष्णुता वाढत आहे. परंतु साहित्यिक, लेखकांनी लिहित राहिले पाहिजे. धार्मिक, राजकीय अंगाने स्वातंत्र्यावर गदा येते, समाजाच्या दृष्टीने विचार करता समाजाने विशिष्ट प्रवाहाशी बांधलेपण न ठेवता प्रवाही राहिले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मागतो तेव्हा फक्त विद्रोहीपणा करू नये. तेव्हा जबाबदारीही जाणून घ्यावी. समाजाला पुढे नेणारे लेखन हवे.

Related posts: