|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नागरिकत्व विधेयकावरून शिवसेनेचे घुमजाव

नागरिकत्व विधेयकावरून शिवसेनेचे घुमजाव 

दुरुस्ती विधेयकात स्पष्टता येईंपर्यंत पाठिंबा नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पवित्रा

लोकसभेत विधेयकाच्या बाजून केले होते मतदान

मुंबई / प्रतिनिधी

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती †िवधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱया शिवसेनेने मंगळवारी या मुद्यावरून घुमजाव केले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत समाधानकारक स्पष्टता येत नाही तोपर्यंत त्याला पाठिंबा देणार नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेत शिवसेना या विधेयकाला विरोध करेल, अशी चिन्हे आहेत.

मुस्लिमधर्मीय वगळता शेजारच्या देशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौध्द धर्मातील नागरिकांना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व  देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना विधेयकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या खासदारांनी विधेयकाबाबत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबद्दल जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आपला पक्ष राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये, असेही त्यांनी ठणकावले.

लोकसभेत सत्ताधारी पक्षाकडून जे मांडले जाते त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजे देशभक्ती आणि विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी बाहेर यायला हवे. लोकसभेत सोमवारी मांडलेल्या विधेयकाबद्दल अजून नीट स्पष्टता नाही. या विधेयकाबद्दल देशाला अनेक प्रश्न पडले आहेत. ते आम्ही सभागृहात मांडले. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सूचवल्या आहेत, त्या सुधारणा करूनच राज्यसभेत विधेयक आले पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

जर विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात भीती असेल तर ती दूर करण्याची गरज आहे. शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

चौकट

सरकार वाचविण्यासाठी भूमिका बदलली का?

दरम्यान, राज्यातील सरकार वाचविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दबावाखाली येऊन नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर भूमिका बदलली काय? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कुणाच्याही दबावाला न जुमानता शिवसेनेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी

किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करून अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिल्याची टीका काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली आहे. विधेयकाला समर्थन देण्याच्या शिवसेनेच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना खान यांनी

याप्रकरणी शिवसेनेने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

‘या विधेयकावर राज्यसभेत विस्तृत चर्चा व्हावी अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. देशाची चिंता फक्त आपल्यालाच आहे असे जर भाजपला वाटत असेल तर तो भाजपचा भ्रम आहे’

उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख

Related posts: