|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लोकचळवळीचे दुसरे नाव…‘तरूण भारत’ !

लोकचळवळीचे दुसरे नाव…‘तरूण भारत’ ! 

वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

आज प्रसारमाध्यमे समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. प्रशासनावर वचक ठेवण्यामध्येही प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांनी चुकीची भूमिका घेतली तर अराजक माजेल. सातत्याने अन्यायाविरोधात लढत असल्याने ‘तरुण भारत’ केवळ वृत्तपत्र न राहता ते  लोकचळवळीचे दुसरे नाव बनले आहे, असे मत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले. ‘तरुण भारत’ रत्नागिरी आवृत्तीच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळावा व ‘तरुण भारत सन्मान’ प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

  वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपत रत्नागिरीकरांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱया ‘तरूण भारत’ रत्नागिरी आवृत्तीचा 24 वा वर्धापन दिन सोमवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. शहरातील माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात स्नेहमेळावा, ‘डिजिटल विश्व’ या 44 पानी पुरवणीचे प्रकाशन, ‘तरूण भारत’  सन्मान सोहळय़ाला जिल्हय़ातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, प्रशासकीय अधिकारी, वाचक, हितचिंतक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी आर्वजून उपस्थिती लावली. सर्वांनी ‘तरूण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर झालेल्या ‘स्वरसंध्या’ या पूर्णपणे महिलांनी सादर केलेल्या पहिल्या संगीत कार्यक्रमाला रत्नागिरीतील रसिकांनी उत्स्फूर्त उपस्तिती दर्शविली.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी शास्त्रज्ञ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समाजाला दिशादर्शक कार्य करणाऱया जिह्यातील व्यकती व संस्थांचा ‘तरुण भारत सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खेडची तन्वी रेडीज, रत्नागिरीची आकांक्षा कदम, मंडणगडची क्रांती म्हस्कर, रत्नागिरीचा चैतन्य परब, खेडचे सुशिल तांबे, चिपळुणचे डॉ. अल्ताफ सरगुरोह,  आबलोलीचे विद्याधर कदम, चिवेलीच्या सरपंच प्रमीला शिर्के, राजापूरचे उल्हास खडपे, प्रज्योत खडपे व शिवा खानविलकर आणि देवरुखच्या रजनी भोसले यांचा वैयक्तिक तर मानाचा गणपती आपत्कालिन मंडळ दापोली व शेतकरी-शास्त्रज्ञ मंच, लांजा या संस्थांना ‘सन्मान’  प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी शासन-प्रशासन व समाज घडवण्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले. ययावेळी बोलताना त्यांनी ‘तरुण भारत’च्या निःपक्ष  भूमिकेचे व सातत्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. कोणत्याही बाह्य प्रभाव अथवा शिफारसीशिवाय पारदर्शकपणे दिलेले दिलेले तरुण भारत सन्मान पुरस्कारविजेत्यांची त्यांनी प्रशंसा केली. 

यावेळी उपस्थित प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी ‘तरुण भारत’च्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे कौतुक केले. ‘तरुण भारत’च्या सर्व पुरवण्यांचे देखील कौतुक केले. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांनी ‘तरुण भारत’ने योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याचे सांगून अशी कौतुकाची थशप मोठी प्रेरणा देत असल्याचे सांगितले.  कोकणातील शेती महिलांच्या हातात आहे व महिला कधीच तोटय़ाचा व्यवसाय करत नाही, म्हणूनच कोकणामधील शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. येथील प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ असल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढल.s शेतीमध्ये विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. नेहनीच सत्याची कास धरल्याने ‘तरुण भारत’ सर्वदूर पोहोचल्याचे सांगत त्यांनी ‘तरुण भारत’च्या गौरवशाली परंपरेचे कौतूक केले.

‘तरुण भारत’चे चिफ मार्केटिंग ऑफिसर उदय खाडिलकर यांनी ‘तरुण भारत’चा इतिहास थोडक्यात मांडला. सडेतोड व पारदर्शक भूमिकेमुळे ‘तरुण भारत’ स्वत:च एक चळवळ बनली असून सीमाप्रश्नी ‘तरुण भारत’ने वाहून घेतल्याचे देखील ते म्हणाले. तरुण भारत सन्मान प्राप्त व्यक्तींनी ‘तरुण भारत’ला सत्कार करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी सर्व सत्कारमूर्तींचे व संस्थांचे आभार मानले. त्यांच्यापासून समाज प्रेरणा घेऊन भविष्यात अधिकाधिक लोकांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवृत्ती प्रमुख राजा खानोलकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ‘तरुण भारत’च्या वाटचालीचा आढावा घेतानाच भविष्यातील उपक्रमांचीही माहिती दिली. ‘तरुण भारत’  ने रत्नागिरीमध्ये महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘अस्मिता’ या उपक्रमाला लाभलेल्या प्रतिसादाबद्दल रत्नागिरीतील महिलांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘तरुण भारत’चे विश्वेश जोशी यांनी केले, तर सुकांत चक्रदेव यांनी आभार मानले. पूर्णपणे महिलांनीच सादर केलेल्या अस्मिता स्वरसंध्या या जिह्यातील पहिल्या सांगितिक कार्यक्रमाने  स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

अच्छे दिन येण्यापेक्षा, सच्चे दिन यावेत

 सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना चिपळूणमधील प्रमिलाताई शिर्के यांनी ‘तरुण भारत’चे आभार मानले. हा सन्मान हा आपला एकटय़ाचा नसून सर्व ग्रामस्थांचा असल्याचें त्या म्हणाल्या. त्यांनी यावेळी समाजातील काही विरोधाभासांवर बोट ठेवले. अच्छे दिन येण्यापेक्षा सच्चे दिन यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण महिलांना ‘तरुण भारत’ने प्राधान्यक्रम द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

Related posts: