|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा ‘आयपीसी 307 ए’

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा ‘आयपीसी 307 ए’ 

मराठी चित्रपटसफष्टीत माफिया जगाचा किंवा गुन्हेगारी जगाचा वेध घेणारे फारच थोडे चित्रपट आजवर झाले. त्यातही अगदीच काही चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवले. आता ‘आयपीसी 307 ए’ या चित्रपटातून माफिया जगाची आणि तरीही भावनिक कथा मांडण्यात आली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  संघर्षयात्रा, शिव्या असे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या साकार राऊत यांनी अर्थ स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘आयपीसी 307 ए’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्नील देशमुख यांनी दिग्दर्शन केले असून, अभिनेता सचिन देशपांडे प्रमुख भूमिका साकारत आहे. सचिन सोबत अन्य कलाकारही यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. संघर्षयात्रा आणि शिव्या या चित्रपटांतून साकार राऊत यांनी दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केली होती. आता निर्माता म्हणून त्यांनी निवडलेला विषय आणि संहिता चित्रपटाच्या रुपात पडद्यावर येत आहे. चित्रपटाच्या नावामुळे कायद्याच्या अंगाने जाणारा गुन्हेपट असेही ‘आयपीसी 307 ए’ असा चित्रपट म्हणता येईल. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Related posts: