|Monday, March 30, 2020
You are here: Home » क्रिडा » द्रविडचा चिरंजीव समितचे शानदार द्विशतक

द्रविडचा चिरंजीव समितचे शानदार द्विशतक 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतेर्फे येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील वयोगटाच्या विभागीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत व्हाईस प्रेसिडेंट  संघाकडून खेळताना भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा चिरंजीव समितने शानदार द्विशतक झळकविले.

  व्हाईस प्रेसिडेंट आणि धारवाड विभाग संघ यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षीय समितने 256 चेंडूत 22 चौकारासह 201 धावा पहिल्या डावात झळकविल्या. या सामन्यात समितने दुसऱया डावातही 94 धावांची खेळी केली. समितने अष्टपैलू कामगिरी करताना या सामन्यात 26 धावात 3 गडी बाद केले. हा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला.

   गेल्यावर्षी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील वयोगटासाठी आयोजिलेल्या बीटीआर चषक क्रिकेट स्पर्धेत समितने  मॅली आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना 150 धावा झोडपल्या होता. 2015 साली झालेल्या 12 वर्षाखालील वयोगटाच्या गोपालन क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत समितने सर्वोत्तम फलंदाजा पुरस्कार मिळविला होता. या स्पर्धेत त्याने तीन अर्धशतके झळकविली होती. समितने वडील राहुलने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 164 कसोटीत 52.31 धावांच्या सरासरीने  286 डावात 13,288 धावा जमविल्या आहेत. बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची प्रमुख जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपविण्यात आली आहे.

Related posts: