|Monday, January 27, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » शब्दोत्सवात वाचकांसाठी लाखो ग्रंथांची पर्वणी

शब्दोत्सवात वाचकांसाठी लाखो ग्रंथांची पर्वणी 

 गाळे नोंदणीसाठी प्रकाशकांचा प्रतिसाद

  पुणे / प्रतिनिधी : 

शब्दांचा उत्सव अशी संमेलनाची ओळख आहे. त्यामुळेच संमेलनात ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. एकाच छताखाली लाखो ग्रथांची उपलब्धी हे साहित्यप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणी असते. उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनातही वाचक आणि लेखकांना त्याची प्रचिती येणार आहे. कारण, राज्यभरातील प्रकाशकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात शब्दवेडय़ा वाचकांसाठी लाखो ग्रंथ उपलब्ध असणार असल्याची माहिती ग्रंथ प्रदर्शन समितीच्या सदस्या सुनिताराजे पवार यांनी दिली.

येत्या 10 ते 12 जानेवारी दरम्यान संमेलन होणार आहे. या संमेलानत गंथ दालनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. येत्या 27 डिसेंबरपर्यंत प्रकाशकांना गाळ्याची नोंदणी करता येणार आहे. आत्तापर्यंत विविध प्रकाशकांनी गाळ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने गाळ्यांचे वाटप केले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाल्या, ग्रंथ प्रदर्शनात 80 बाय 200 फूट आकाराचे तीन मोठे डोम असणार आहेत. त्यात सुसज्ज असे 300 ग्रंथगाळे असतील. वाचक, लेखकांना फिरता यावे यासाठी दोन गाळ्यांमध्ये 16 फूट रूंदीचा रस्ता असणार आहे. एका गाळ्याचा आकार 3 बाय 4 मीटर इतका असेल. तेथे प्रकाशकांसाठी पिण्याची पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. ग्रंथदालनात सगळीकडे मॅट अंथरले जाणार आहेत. ग्रंथालयात चारही बाजूंनी रसिकांना वावरता येईल अशी रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. एका गाळ्यासाठी 6500 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुनीताराजे पवारः 9823068292, केलास अतकरेः 9325214191 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच abmss93osmanabad@gmail.com असे या संकेतस्थळावरही नावनोंदणी करता येणार आहे.

Related posts: