|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलीस एफबीआयची मदत घेणार

एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलीस एफबीआयची मदत घेणार 

ऑनलाइन टीम / मुंबई  : 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणीच्या तपासात पुणे पोलीस आता थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या एफबीआयची मदत घेणार आहे. या प्रकरणी अटकेत असलेले वरावर राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधला डाटा मिळविण्यासाठी ही मदत घेण्यात येणार आहे.

वरावर राव यांच्यावर माओवाद्यी चळवळीला मदत करण्याचा ठपका आहे. पोलिसांनी राव यांच्या घरी छापा घालून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र त्यातून मोठा प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आलाय. तो डेटा मिळविण्यासाठी पोलीस ही मदत घेण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱया विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.

 

Related posts: