|Thursday, February 20, 2020
You are here: Home » solapur » लाचलुचपत विभागाची कारवाई तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

लाचलुचपत विभागाची कारवाई तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल 

प्रतिनिधी / सांगोला

कमलापुर ता. सांगोला येथील तक्रारदार याच्या वडीलोपार्जित जमिनीचा सातबारा उतारा दुरुस्ती करण्यासाठी तलाठी व खाजगी एजंट हे लाच मागत असल्याची तक्रार दि. 7/8/2019 रोजी नोंदविली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापुर यांनी पडताळणी केली. त्यावर तलाठी विनोद विठ्ठल भडंगे व खाजगी एजंट रामदास काळे यांनी 10 हजाराची लाच मागीतल्याचे निष्पण्ण झाल्याने तलाठी विनोद भडंगे व खाजगी एजंट रामदास काळे यांच्यावर काल गुरूवार दि. 26 डिसें. 19 रोजी सांगोला पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ला.प्र. वि.चे पोनि. जगदीश भोपळे यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे दिली.

कमलापुर ता. सांगोला येथे वडीलोपार्जित जमिनीचा सातबारा उतारा दुरुस्त करणेकामी तक्रारदाराला 10 हजाराची लाच खाजगी एजंटामार्फत मागण्यात आली होती. त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुन यावर संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्याची शहानिशा करुन त्यांनी लाच मागितल्याचे निष्पण्ण झाले. म्हणुन कमलापुरचे तलाठी विनोद भडंगे व खाजगी एजंट रामदास काळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलिस अधिक्षक, ला.प्र. वि. पुणे, संजय पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक, ला.प्र. वि. पुणे, संजीव पाटील पोलिस उपअधिक्षक, ला.प्र. वि. सोलापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, सपोफौ जाधवर, पोहवा चंद्रकांत पवार, पोकॉ. देशमुख, पोकॉ जानराव, चापोकॉ, शाम सुरवसे ला.प्र. वि सोलापुर यांनी केली आहे.

जर कोणी शासकिय व निमशासकीय लोकसेवक त्यांच्या अखत्यारीत काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापुर कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा फ्री क्रमांक 1064 व फोन नं. 0217-2312668 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोनि जगदीश भोपळे यांनी केले आहे.

Related posts: