|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पहिल्या एमएनजीएल भवनचा भूमीपूजन सोहळा शनिवारी

पहिल्या एमएनजीएल भवनचा भूमीपूजन सोहळा शनिवारी 

पुणे / प्रतिनिधी :  

 महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने निर्माण करण्यात येणाºया पुण्यातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालेवाडीतील साई चौक येथे भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भूमीपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, चीफ जनरल मॅनेजर प्रोजेक्ट शत्रुंजय सिंग, जनरल मॅनेजर मार्के टींग सुजीत रुईकर, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख अमोल हट्टी उपस्थित होते. याच दिवशी सीएनजी स्टेशन वास्तूचे देखील भूमीपूजन होणार आहे. खासदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

संतोष सोनटक्के म्हणाले, बालेवाडी येथे बांधण्यात येणारे एमएनजीएल भवन हे पुण्यातील पहिले एमएनजीएल भवन आणि मुख्य कार्यालय असणार आहे. पुणे, नाशिक, सिंधुदूर्ग, रामनगर या विभागाचे काम या भवनातून होणार आहे.  पर्यावरणपूरक आणि भरपूर नैसर्गिक प्रकाश हे या भवनाचे वैशिष्ट्य आहे. रिड्यूस, रिसायकल आणि रियूज या तत्त्वांवर हे भवन उभे करण्यात येत आहे. हे भवन साकारण्यास साधारण २ वर्षाचा कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

राजेश पांडे म्हणाले, एमएनजीएल भवन ही तब्बल ८ मजली इमारत असेल. यामध्ये २ तळघर असतील.  प्रत्येक मजला १० हजार चौरस फूट याप्रमाणे ८० हजार चौरस फूट एवढे भव्य हे कार्यालय असणार आहे. एकूण ३०० कर्मचारी कार्यालयात काम करु शकतील. भवनाच्या छतावर सौर उर्जा पॅनेल असणार आहे. यासोबतच तळमजल्यावर तब्बल ४ हजार चौरस फूट जागेत श्वासोच्छवासासाठी बाग अशी वेगळी संकल्पना असणारी बाग साकारण्यात येणार आहे.

Related posts: