|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सांगलीची ‘शेवट तितका गंभीर नाही’ प्रथम

सांगलीची ‘शेवट तितका गंभीर नाही’ प्रथम 

डोंबिवलीची ‘भ्रम-रात्र’ द्वितीय, पिंगुळीची ‘भैरवी’ तृतीय : नाथ पै एकांकिका स्पर्धा निकाल

कणकवली:

येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेत खुल्या गटात समांतर संस्था विश्रामबाग, सांगलीच्या ‘शेवट तितका गंभीर नाही’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. स्वामी नाटय़ांगण, डोंबिवली – मुंबईच्या ‘भ्रम-रात्र’ने द्वितीय, तर नाटय़वेद पिंगुळीच्या ‘भैरवी’ने तृतीय क्रमांक पटकावला. रविवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या स्पर्धेनंतर शालेय व खुल्या गटातील विजेत्यांना मान्यवर, परीक्षक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अन्य पारितोषिके पुढीलप्रमाणे : लेखक-1. प्रसाद खानोलकर (भैरवी). दिग्दर्शन -1. इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही), 2. यश नवले, राजेश शिंदे
(भ्रम-रात्र), 3. प्रसाद खानोलकर (भैरवी). तांत्रिक अंगे-1. शेवट तितका गंभीर नाही, 2. भ्रम-रात्र, 3. भैरवी. अभिनय (पुरुष)-1. मयुर महादेव पाटील (भूमिका -‘तुकाराम’, एकांकिका-‘शेवट तितका गंभीर नाही’), 2. नचिकेत दांडेकर (भूमिका-‘आलोक’, एकांकिका-‘भ्रम-रात्र’), 3. तेजस तुळाजी मसके (भूमिका-‘उत्तम, कीर्तनकार’, एकांकिका-बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळची ‘दहन आख्यान’). अभिनय (स्त्री)-1. पूजा खानोलकर (भूमिका-‘स्त्री’, एकांकिका-‘भैरवी’), 2. वैष्णवी उमेश शेटे (भूमिका-‘चिंगी’, एकांकिका-नवभारत शिक्षण मंडळ सांगलीची ‘हिरवीन’), 3. अंकिता चिंदरकर (भूमिका-‘अमृता’, एकांकिका-‘अक्षरसिंधू साहित्य कलामंच कणकवलीची ‘मेंढीकोट.’)

बक्षीस वितरणप्रसंगी परीक्षक तथा रंगकर्मी, नाटय़लेखक, दिग्दर्शक संभाजी सावंत, ज्ये÷ रंगकर्मी प्रदीप राणे, नाटय़ अभ्यासक प्रा. डॉ. मेधा सिधये, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, राजा राजाध्यक्ष, शरद सावंत, ऍड. नानू देसाई, धनराज दळवी, लीना काळसेकर, सीमा कोरगावकर, ओम आळवे, प्रसन्ना देसाई, उमेश वाळके, प्राजक्ता आळवे आदी उपस्थित होते.

Related posts: