|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहनधारकांनी घेतलाय जीवमुठीत…

वाहनधारकांनी घेतलाय जीवमुठीत… 

प्रतिनिधी/ सातारा

शहराचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पोवईनाका आता अपघाताना निमंत्रण देत आहे. गेड सेपरेटरच्या खोदकामामुळे खड्डी मातीचे ढिग सगळीकडे लागले आहेत. तसेच स्लॅबवरून जाताना रस्त्यालगत चढ-उतार निर्माण झाला आहे. यामुळे वाहनांचे चाक घसरून दररोज अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तक्रार करण्याची कुणाकडे असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

      अडीच वर्षापासून सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सूरू आहे. पोवईनाक्यावरील स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या स्लॅबवरून जाताना वाहनधारकांना जीवमुठीत घ्यावा लागत आहे. या ठिकाणी तहसिलदार कार्यालय, कासटमार्केट, सिव्हिल हॉस्पिटल, राजपथ, कर्मवीर पथ मार्ग दुचाकी-चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. या स्लॅबच्या लगत असणारा रस्त्यावर चढ-उतार निर्माण झाला आहे. हे वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने वाहनांचे चाक घसरून अपघात होत आहेत. शुक्रवारी एक महाविद्यालयीन युवती पोवईनाक्यावरून जाताना गाडीचे चाक घसरून तिचा अपघात झाला. यावेळी मागून येणाऱया चारचाकी वाहनाने तिला फरफडत नेले. या अपघातात युवती जखमी झाली. तिला उचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेहण्यात आले. मात्र युवतीने या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्ये केली नाही.

हा पोवईनाक्यावरचा पहिला अपघात नसून गेल्या दिड महिन्यापासून 10 ते 15 अपघात याच ठिकाणी झाले आहेत. दररोज दोन-तीन वाहनधारकांचे अपघात या  ठिकाणी होत आहेत. वारंवार अपघात होत असल्याने वाहनधारकांनी जीवमुठीत घेतला आहे. या मार्ग जाताना वाहनधारकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्यालगत निर्माण झालेला चढ-उतार कमी करण्यासाठी अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत. यामुळे नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related posts: