|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » काव्य संमेलनात साताकर भिजले चिंब

काव्य संमेलनात साताकर भिजले चिंब 

प्रतिनिधी/ सातारा

मी जेवढं आईवर प्रेम करतो, तेवढचं कवितेवर करतो. कवितेवर माझी निष्ठा आहे. कविता माझी पंढरी आहे. कविता माझी मायमाऊली आहे, अशा शब्दात कवितेचे वर्णन कविवर्य उद्धव कानडे यांनी करुन ग्रंथ महोत्सवातील काव्य संमेलन वेगळय़ा उंचीवर नेवून ठेवले होते. तर प्राचार्या विश्रांती कदम यांनीही ‘कोण्या एका म्हातारीचे वय आहे साठ, जरा कंबर वाकली आहे मान ताठ’ ही कविता सादर करुन आणखी रंगत आणली. बारामतीच्या पोपट वाभळे यांनी ह्रदयस्पर्शी गझल सादर करुन वाहवा मिळवत वन्स मोअर साताकरांना म्हणायला भाग पाडले.  

ग्रंथ महोत्सवात कवी संमेलनाचे उद्घाटन कवी उद्धव कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण सचिव देवीदास कुल्हाळ, प्रदीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्धव कानडे म्हणाले, जेवढं मी आईवर प्रेम करतो, तेवढेचं कवितेवर करतो. कवितेवर माझी निष्ठा आहे. कवितेवर माझे प्रेम आहे. एसटीचा संप असला, वाहनांचा संप आला तरीही मी चालत येईन. जसा वारकरी पांडुरंगाच्या भेटीला चालत जातो, तसाच मी या ग्रंथ पंढरीला चालत येईन. आज सगळं बदलले आहे ना. मुलं, आई-वडिलांचं ऐकत नाहीत. सुखाच्या सगळ्याच व्याख्या बदलून गेल्यावर.. किडा मुंगीसारखं आयुष्य झालं आहे. त्यानेचं विचारावं पप्पा प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे दुधावरची साय… म्युझियममध्ये ठेवायला शिल्लक नाही हिरवळ… असा काव्य ओळींनी त्यांनी साज चढवला. पुढे आराधना गूरव यांनी ‘न्हान आलया कवळ्या कांतीला, मांडवा चढू द्या.. देह हा मोत्याचा..’ ही कविता सादर केली. आष्टे शाळेवरच्या शिक्षिका हेमा जाधव यांनी वर्तुळ ही कविता सादर केली. त्यामध्ये ‘तू माझ्यासाठी वर्तुळ पण तू माझ्यासाठी बिंदू…, की माझ्या वर्तुळाला केंद्र नव्हते… त्यावर वाहवा मिळवली. बारामतीच्या पोपट वाभळे यांनी गझल सादर केली. ‘माझे दुःख सांगू शकतं नाही, जखमा आतल्या काळजात, चेहऱयाला छान म्हणालो… पिंपळाचे पान म्हणालो, घेतल्यावर चढली नाही एक प्याला आन म्हणालो, शब्द घुसला छातीमध्ये, चालवेना रस्ता रस्ता’, अशी शानदार सादर करताच त्यांना वन्समोअर असा नारा साताकरांनी दिला. विश्वजीत बनसोडे यांनी भूक कशी भागवायची…, भागवायला पर्याय नसतो, चिमुकला जीव भूक भागवायला, नियती पुढे, भूक ही कविता सादर करुन वेदना मांडल्या. दहावीतल्या ईश्वरी नलावडे हिने असे बाबा नेहमीच का घडत… मी काही मागायच्या आत तू आणून देतो, बाबा तुझ्या बनियनला पडलेत भोक.. एकच चप्पल घालतोस, ही बाप नावाची कविता सादर करुन वेगळय़ा उंचीवर नेले. ऋतुजा पंडित हिने स्त्राrने जगावं की मरावं.., तिला ही भावना असतात ही स्त्राr जन्माची कहानी सांगणारी कविता सादर केली. ऋषिकेश पवार याने ‘संविधान माझा बाप आहे’ ही कविता सादर केली. पाटणचे दादा सावंत यांनी ज्ञान घेतो, ज्ञान देतो.. अन्यायावर आवाज उठवतो… खोटय़ाला धडा शिकवतो जनसेवेचा मंत्र जपतो, तर जिजामाता अद्यापक कॉलेजच्या प्राचार्य विश्रांती कदम कोण्या एका म्हातारीचे वय आहे साठ, जरा कंबर वाकली आहे मान ताठ’ ही काकू ही कविता सादर केली. प्रा. माधुरी धायगुडे यांनी व्यथा ऊस तोड कामगारांची ही कविता सादर केली. अधिव्याख्याता राजश्री तिटकारे यांनी सध्याचा पॅटर्नवर कविता सादर केली. शेतीच स्वप्न भंगलं म्हणून बापानं टांगल, घरात केली दंगल म्हणून पोलीस स्टेशन गाठलं… ही सादर केली. लहानग्या समृद्धी पवार हिने सैनिक ही कविता सादर करुन वेगळय़ा उंचीवर नेवून ठेवला.

उद्धव कानडे यांनी पुन्हा सूत्रे आपल्याकडे घेतली. ते म्हणाले, पाऊस काय करतो, घरदार वाहून नेतो, कोणाला बसवतो तर कोणाला निवडून पण देतो, तो काय पण करतो, असे सांगत ते म्हणाले, कविता लिहिण्यासाठी प्राचार्य, शिक्षक व्हावं लागत असे काही नाही. मातंग समाजातील दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱया लिहिल्या. त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी झिजले ते कर्मवीर भाऊराव पाटील असे सांगत त्यांनी कविता एकच मागणी असते. अनुभवाशी प्रामाणिकता असते. जे जगला ते मांडले जाते. यांच्या कवितेतील शब्द ह्रदय कोषातून आले आहेत. जगण्याला भिडणारे आहेत असे सांगत त्यांनी पाऊस नसताना ही कविता अगोदर आपल्या पद्धतीने सादर केली. आयुष्यात सगळा ओलावा आतून गेलेल्या माळरानावर पुन्हा पुन्हा टिच टिच गुर, या खेळाला माळाचा की भाळाचा खेळ म्हणतात, अशी सादर केली. पुढे त्यांनी पाऊस असल्यावर ही कविता सादर केली. जेवण करताना दारात येणाया भिकाऱयाला हाकलून देणाऱया.., कसाही असेना भर पावसात…,उन्हाळे मागत असतो, अशा कविता सादर झाल्या.::

फुलाबाई फडतरे यांना आदरांजली

काव्य संमेलन सुरु असतानाच संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार यांच्या मातोश्री फुलाबाई फडतरे यांचे पुण्यात निधन झाल्याचे संयोजकांना समजले. ग्रंथ महोत्सवाच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.::

Related posts: