|Monday, January 27, 2020
You are here: Home » Automobiles » किया मोटर्सची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच

किया मोटर्सची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘किया मोटर्स’ भारतात दुसरी मल्टी पर्पज कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘Carnival’ असे या कारचे नाव असून, फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये होणाऱया ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे.

कियाच्या भारतातील डिलर्सकडून या कारसाठी बुकींग करण्यात येत असून, ही कार टोयोटा इनोव्हा क्रिस्टा यासारख्या प्रिमियम कारला टक्कर देणार आहे.भारतात कार्निवल एमपीवी 6, 7 आणि 8 अशा तीन प्रकारात उपलब्ध केली जाईल. टॉप मॉडेल 6 सिटर आणि सुरुवात एन्ट्री लेवलचे मॉडेल 8 सिटरचे असेल.

कार्निवल एमपीवीमध्ये 2.2-लीटर, 4-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजीन 3,800 आरपीएम वर 200 बीएचपी एवढी शक्ती आणि 1,750-2,750 आरपीएम वर 440 एनएम पीक टॉर्क जेनरेट करते. हे इंजिन बीएस 6 शी कम्प्लायंट असणार आहे. या कारला 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारची किंमत 30 लाखांच्या घरात असणार आहे.

 

Related posts: