|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » शाकंभरी पौर्णिमेला गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न करा

शाकंभरी पौर्णिमेला गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न करा 

बुध. दि. 8 ते 14 जाने. 2020

येत्या 10 तारखेस शाकंभरी पौर्णिमा आहे परस्परातील गैरसमज मिटविण्यास हा दिवस अतिशय चांगला मानला जातो. देवीच्या कृपेने संबंध सुधारतात व भाग्योदयातील धनलाभातील अडथळे कमी होतात. स्वत:च्या  कष्टाने चांगले नाव कमावले, शिक्षणात वरचा क्रमांक घेतला, सर्वत्र त्याची वाहवा सुरू झाली की तो आमचा नातेवाईक आहे, आम्हीच त्याला वर आणले, त्याला अन्नाला आम्हीच लावले, त्याला शिक्षणासाठी मदत केली, त्याला हे शिकविले ते शिकविले आमच्यामुळेच तो नोकरीला  लागला, असा बडेजाव अनेकजण सांगतात. पण त्या व्यक्तीला जीवनात प्रगती करून घेण्यासाठी किती कष्ट करावे लागले, त्याला जीवनात किती खडतर प्रसंगाना तोंड द्यावे लागले, त्याबद्दल या लोकांना विचारा, त्यांना काहीही माहीत नसते. ज्यावेळी त्या व्यक्तीची वेळ चांगली नसते,  गरिबी असते, त्याच्याजवळ कोणताही मोठेपणा नसतो, हुशार असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, चुरमुरे- फुटाणे खाऊन तो दिवस काढत असतो, अंधार कोठडीत पडलेला असतो, खरोखर गरज असते त्यावेळी हे लोक तोंडही दाखवीत नाहीत. जर त्या व्यक्तीच्या काही चुका आढळल्या तर त्याचा आमचा काहीही संबंध नाही, असे सांगणारे लोकही हेच असतात. सर्वांना तेच दिवस रहात नसतात. सूर्योदय, सूर्यास्त प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. त्यासाठी कुणाच्याही परिस्थितीची कधीही टिंगल करू नये अथवा व्यंगाला हसू नये. सायकलने फिरणारी  माणसे नशिबाच्या जोरावर विमानाने फिरू शकतात व दुसऱयावर विनाकारण जळणारी, त्याचा मत्सर करणारी, अथवा एखाद्याला बदनाम करणाऱयांना नियती हसत असते. ज्यावेळी पत्रिकेत एखादा गंभीर दोष दिसून येतो, मोठमोठे आजार, संततीसौख्यात बाधा, लग्नातील अडथळे किंवा असलेले संसार बिघडणे, प्रगल्भ बुद्धिमत्ता असूनही मनाप्रमाणे नोकऱया मिळत नाहीत, या मागील कारणे पाहिल्यास असे का घडते, हे ग्रहावरून सहज कळू शकते. कुंडलीतील ग्रहमान चांगले असूनही जर यश मिळत नसेल तर त्याला वरील बाबीच कारणीभूत असू शकतात.

एखादी व्यक्ती खरोखरच चांगली असते पण त्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरविले जातात व त्यातूनचा तंटे बखेडे सुरू होतात. ज्या व्यक्तीविषयी गैरसमज निर्माण होतात त्या व्यक्तीचे तोंडसुद्धा या लोकांनी पाहिलेले नसते. त्यामुळे काहीही कारण नसताना गैरसमज निर्माण झाल्यास पत्रिकेतील चांगले गुणधर्म कमी होतात व पुढे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतात. काही लोकांना अचानक मोठी  इस्टेट मिळाली किंवा भरमसाठ पैसा मिळाला की ते इतरांना कस्पटासमान लेखू लागतात. आपण सर्वश्रे÷ असल्याचा साक्षात्कार त्यांना होऊ लागतो. अशा व्यक्ती पैशाच्या जोरावर इतरांविषयी गैरसमज निर्माण करतात. नातीगोती, स्नेहसंबंध वगैरे काही त्यांना दिसत नाही पण ज्यावेळी अशा लोकांवर संकटे येतात, त्यावेळी त्यांच्या स्वभावामुळे कुणीही त्यांना मदत करीत नाहीत. हल्लीच्या काळात पैसाअडका अतिशय महत्त्वाचा आहे, पण माणसेही तितकीच महत्त्वाची असतात हे विसरु नये. वर दिलेले उदाहरणे ही सत्यपरिस्थितीवर आधारित आहेत. त्यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. कुंडलीतील ग्रहमान चांगले असूनही माणसाला यश का मिळत नाही, गैरसमजामुळे भाग्य कसे बिघडते हे दाखविलेले आहे.

 

मेष

मंगलकार्य महत्त्वाच्या वाटाघाटी, कर्जफेड, देणेघेणी, नातेसंबंध सुधारणे, धनलाभ, प्रवास, नोकरी व्यवसाय व पत्रव्यवहार या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. जुनी येणी वसूल होतील. हातून गेलेला अधिकार पुन्हा परत मिळेल. एखाद्यावर सोपविलेले महत्त्वाचे काम होईल. हरवलेल्या वस्तू परत मिळतील.


वृषभ

कोठेही सही न करता अथवा कोणतेही तारण न देता कुणाला काही दिला असाल तर जरा सावध रहावे लागेल. गोड बोलूनच ते वसूल करण्याची पाळी येईल. जामिनकीपासून दूर रहा, आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. एखादे महत्त्वाचे काम या आठवडय़ात होईल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील.


मिथुन

दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. पण कष्ट व चातुर्य तसेच चौकसबुद्धी याच्या जोरावर बऱयापैकी पैसा मिळवाल. जागा व घर वगैरेच्या प्रयत्नात असाल तर त्रयस्थांच्या मदतीने ते काम होईल. वास्तुदोषाच्या नावाखाली केलेले बदल धोकादायक ठरतील.


कर्क

ग्रहमान सर्व बाबतीत अनुकूल आहे. मनातील सर्व इच्छा पुर्ण करू शकाल. एकाचवेळी अनेक नोकऱयांचे कॉल येतील. अथवा लग्नासाठी तीन-चार स्थळे येतील पण ती सर्वच चांगली असतील असे नाही. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होईल. शांतमनाने निर्णय घ्यावा लागेल. कुणालाही कागदपत्रे दाखवू नका.


सिंह

आत्मविश्वास, धैर्य, कठोर परिश्रम व होकारात्मक विचार असतील तर जगात  काहीच अशक्मय नसते, याचा अनुभव येईल. स्वत: केलेले कोणतेही काम चांगले असते पण जर त्यात जर गोडी नसेल तर होणार कामही फिसकटते, याचा अनुभव येईल. तारतम्याने सर्व गोष्टीचे मर्म ठरवावे लागेल.


कन्या

मंगळ काही बाबतीत अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. बुधाची प्रखरता जाणवू लागेल. त्यासाठी देवधर्माबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोनही चांगला ठेवा, म्हणजे अपयश येणार नाही. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा आहे. शुक्राच्या कृपेमुळे अनेक संकटातून वाचाल.


तुळ

रवि, मंगळाचा योग अवघड कामात यश देईल. भित्रेपणा व कमीपणा तसेच आत्मविश्वासाचा अभाव राहू देऊ नका. तुमच्या किरकोळ चुकादेखील इतरांना नको ते प्रकार करण्यास भाग पाडतील. रस्त्यातून तुम्ही काळजीपूर्वक चालत असला तरी समोरुन येणाऱयाचा भरवसा नसतो. त्यामुळे तुम्ही सावधनतेने वागले पाहिजे.


वृश्चिक

स्वत:चे काम स्वत:च  केलात तर ते अधिक फायदेशीर ठरेल. धनही देऊन जाईल. बँकेत पैसा आहे पण सद्यक्षणी हातात काही नसेल तर काय होईल, अशी ग्रहस्थिती आहे. कुणाच्याही आग्रहाला बळी पडून नको त्या प्रकरणात गुंतू नका. खर्च, कमाई यांचा ताळमेळ साधणे आवश्यक. कौटुंबिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला मोठे यश प्रदान करील.


धनु

प्रेमप्रकरणात असाल तर विवाह योग, पण त्यामुळे कौटुंबिक संबंध बिघडणार नाहीत याकडेही लक्ष द्या. एखाद्याचे चांगले करावयास जावे पण त्याने त्याचा नको तो अर्थ काढावा, असे विचित्र ग्रहमान आहे. त्यामुळे प्रेम दिखावा व भावनेला महत्त्व न देता कर्तव्याकडे अधिक लक्ष द्या.


मकर

शुक्र, राहुचा योग चांगला नाही. कुणाचे तरी ऐकून असलेला नोकरी व्यवसाय सोडण्याचा विचार कराल, पण ती धोक्याची घंटा ठरेल. गैरसमजातून शत्रुत्व ओढवेल. पूर्वीची जर काही देणी घेणी असतील तर कुणाशी वादावादी झालेली असतील तर ती प्रकरणे बाहेर निघतील. शक्मयतो नमते घेतल्यास चांगले.


कुंभ

धाडसाने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात महत्त्वाच्या पण विचित्र घटना घडतील. सहज केलेल्या थट्टामस्करीमुळे  मन दुखावले जाण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाबतीत चांगले योग. प्रवास, देवधर्म व भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. कुटुंबातील वातावरण आनंदी व समाधानी राहील.


मीन

देव कुणावरही अन्याय करीत नाही. चांगले-वाईट जे काही घडत असते, त्याला आपले या जन्मातील अथवा पूर्वजन्मातील कर्मच कारणीभूत असते, याचा अनुभव येईल. देव देत असतो पण त्याचा योग्य वापर झाला नाही तर उलटही घडू शकते, असे अनुभव या आठवडय़ात येतील.

Related posts: